मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  रेग्युलर ब्राने त्रास होतो तर अशा प्रकारची ब्रा निवडा, मिळेल कंफर्ट

रेग्युलर ब्राने त्रास होतो तर अशा प्रकारची ब्रा निवडा, मिळेल कंफर्ट

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 15, 2023 08:29 PM IST

Bra for Comfort: दररोज ब्रा घातल्याने महिलांना अनेक समस्या निर्माण होतात आणि ते खूप अनकंफर्टेबल राहते. योग्य आकाराची आणि डिझाइनची स्पोर्ट्स ब्रा डेली रुटीनमध्ये बरीच कंफर्टेबल असते.

स्पोर्ट्स ब्रा
स्पोर्ट्स ब्रा

Tips to Buy Perfect Size Sports Bra: ब्रा हा महिलांसाठी सर्वात आवश्यक गारमेंट आहे. पण त्यांना त्याबद्दल अत्यल्प माहिती आहे. कधी स्त्रिया मॅचिंग कपड्यांच्या नावाखाली तर कधी फॅशनच्या नावाखाली चुकीची ब्रा घालतात. त्यामुळे त्यांना पाठदुखी, कंबरदुखी, खांदेदुखीचा त्रास होऊ लागतो. जे एकतर त्या समजून घेत नाही किंवा कळूनही दुर्लक्ष करते. जर तुमची रोजच्या ब्राने तुम्हाला त्रास होत असेल तर योग्य पाऊल उचलणे आणि योग्य ब्रा निवडणे महत्त्वाचे आहे.

चुकीच्या ब्राचा होतो स्तनावर वाईट परिणाम

चुकीची ब्रा घातल्याने ब्रेस्टचा आकार आणि लिंगामेंट्सवर परिणाम होतो. त्यामुळे अनेक वेळा स्तनात वेदना होतात. नियमित ब्रामधील हुक, क्लिप आणि पट्ट्या अनकंफर्टेबल राहतात. जे रक्ताभिसरण रोखतात. ज्यामुळे खांद्यावर आणि बस्टच्या भागावर खुणा तयार होतात. दुसरीकडे उन्हाळ्यात या पट्ट्यांमुळे खाज सुटणे आणि पुरळ येणे सुरू होते तेव्हा स्थिती आणखीनच बिकट होते.

कोणती ब्रा आहे योग्य?

जर तुमचे स्तन हेवी असतील तर सामान्य ब्रा घालण्याऐवजी स्पोर्ट्स ब्रा निवडा. या ब्रा स्तनांना पूर्णपणे आधार देतात तसेच कोणत्याही हालचाली किंवा अॅक्टिव्हिटी दरम्यान स्तन होल्ड करुन ठेवतात. जे केवळ तुमची अस्वस्थता कमी करत नाही तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वाईट दिसणार्‍या परिस्थितीपासून वाचवते.

केवळ जिमवेअर नाहिये स्पोर्ट्स ब्रा

बहुतेक मुली स्पोर्ट्स ब्राकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटते की ती फक्त जिममध्ये जाऊन व्यायाम करण्यासाठी आहे. परंतु जेव्हा तुम्ही दररोज स्पोर्ट्स ब्रा घालता तेव्हा ती खूपच आरामदायक असते आणि हेवी स्तनांना चांगले कव्हरेज देते. मात्र स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही खूप घट्ट ब्रा खरेदी करणार नाही.

स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा

- काही स्त्रिया म्हणतात की स्पोर्ट्स ब्रा खूप घट्ट असतात. परंतु जेव्हा तुम्ही योग्य ब्रा खरेदी कराल तेव्हा ते सपोर्ट करेल.

- स्पोर्ट्स ब्रा विकत घेताना त्याचे स्ट्रॅप्स तुमच्या बोटांवर फिट करुन पहा. जर दोन बोटे जुळत नसतील तर याचा अर्थ ती खांद्यावर घट्ट होतील.

- योग्य आकाराचे ब्रा कप खरेदी करा. जर तुम्हाला योग्य कव्हरेज मिळत नसेल तर कप लहान असू शकतात.

- स्पोर्ट्स ब्राच्या पट्ट्या नेहमी मागच्या बाजूला सरळ असाव्यात. जर तुम्ही हात वर करता तेव्हा ते वर गेले तर याचा अर्थ असा की ब्राचा आकार चुकीचा आहे.

- ब्रा घातल्यावर खोल श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ब्रा बदला.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel