मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  वयाच्या ७१व्या वर्षी झीनत अमानने केला रॅम्प वॉक, पांढऱ्या केसातील स्टाईलवर चाहते फिदा

वयाच्या ७१व्या वर्षी झीनत अमानने केला रॅम्प वॉक, पांढऱ्या केसातील स्टाईलवर चाहते फिदा

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 13, 2023 06:07 PM IST

Lakme Fashion Week: लॅक्मे फॅशन वीकमध्ये अभिनेत्री झीनत अमानने रॅम्प वॉक केला. वयाच्या ७१ व्या वर्षी रॅम्पवर त्यांची स्टाईल आणि आत्मविश्वास पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले असून, इंस्टाग्रामवरील फोटो पाहून चाहते त्यांचे कौतुक करत आहेत.

झीनत अमान
झीनत अमान

Zeenat Aman returns on Ramp: बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री झीनत अमानने रॅम्पवर पुनरागमन करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. वयाच्या ७१ व्या वर्षी त्याची स्टाईल आणि आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. लॅक्मे फॅशन वीकमध्ये डिझायनर शाहीन मननसाठी शोस्टॉपर बनलेल्या झीनत अमानचे फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये त्या रॅम्पवर त्यांचे चमकणारे पांढरे केस फ्लॉन्ट करत आहे. त्याच वेळी, त्यांची स्टाईल पाहता, वयाचा अंदाज लावणे देखील कठीण आहे.

वयाच्या ७१ व्या वर्षी बनल्या शो स्टॉपर

लॅक्मेफॅशन वीकच्या दुसऱ्या दिवशी झीनत अमान डिझायनर शाहीन मननची शो स्टॉपर बनल्या. त्यांनी लाल आणि काळ्या रंगाचा अ‍ॅबस्ट्रॅक्ट पॅटर्न प्रिंटचा ब्लेझर घातला होता. ज्यासोबत काळी पँट पेअर केली होती. फिट बॉडी सोबतच झीनत त्यांच्या खांद्याच्या लांबीचे चांदीसारखे चमकणारे केस रॅम्पवर चमकवत होत्या. डोळ्यांवर लावलेला काळा चष्मा सुद्धा स्टायलिश दिसत होता.

 

लॅक्मे फॅशन वीकच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहते त्यांची जोरदार प्रशंसा करत आहेत आणि WOW सारख्या कमेंट करत आहेत. एका चाहत्याने झीनतला लीजेंड म्हटले आहे, तर काहींनी त्यांच्या रॅम्प वॉक पाहिल्यानंतर हा एक अतिशय हृदयस्पर्शी क्षण असल्याची कमेंट केली आहे.

झीनत अमान
झीनत अमान

झीनत अमानने त्यांच्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. अनेक रॅम्प वॉक करून त्या चित्रपटांपर्यंत पोहोचल्या. झीनत अमानने त्यांच्या मॉडेलिंगच्या दिवसांमध्ये फेमिना मिस आणि मिस एशिया पॅसिफिक इंटरनॅशनल हे खिताब जिंकले. काही दिवसांपूर्वी झीनत अमानने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एन्ट्री केली आहे. इंस्टाग्रामवर चांदीचे केस आणि फिट फिगर असलेली झीनतची स्टाईल पाहून लोक खूप आश्चर्यचकित झाले आहेत आणि जोरदार प्रशंसा करतात.

WhatsApp channel

विभाग