मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Salman Khan: ‘त्याने सर्वांसमोर माझी माफी मागावी’; सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड पुन्हा खवळली!

Salman Khan: ‘त्याने सर्वांसमोर माझी माफी मागावी’; सलमान खानची एक्स-गर्लफ्रेंड पुन्हा खवळली!

Jan 07, 2023, 02:10 PM IST

    • Somy Ali Allegations on Salman Khan: गेल्या काही महिन्यांपासून सोमी अली सलमान खानविरोधात बोलताना दिसत आहे. या दरम्यान तिने सलमानने आपल्याला मारहाण केल्याचे देखील म्हटले होते.
Somy Ali Allegations on Salman Khan

Somy Ali Allegations on Salman Khan: गेल्या काही महिन्यांपासून सोमी अली सलमान खानविरोधात बोलताना दिसत आहे. या दरम्यान तिने सलमानने आपल्याला मारहाण केल्याचे देखील म्हटले होते.

    • Somy Ali Allegations on Salman Khan: गेल्या काही महिन्यांपासून सोमी अली सलमान खानविरोधात बोलताना दिसत आहे. या दरम्यान तिने सलमानने आपल्याला मारहाण केल्याचे देखील म्हटले होते.

Somy Ali Allegations on Salman Khan: बॉलिवूडचा ‘दबंग’ अर्थात अभिनेता सलमान खान नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. अनेकदा त्याचे नाव बॉलिवूडच्या बऱ्याच अभिनेत्रींसोबत जोडले गेले आहे. अशाच अभिनेत्रींपैकी एक आहे सोमी अली. तब्बल २० वर्षांनंतर सोमी अली हिने सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सोमी अली सलमान खानविरोधात बोलताना दिसत आहे. या दरम्यान तिने सलमानने आपल्याला मारहाण केल्याचे देखील म्हटले होते. आता सलमान खान याने सर्वांसमोर माझी जाहीर माफी मागावी, अशी मागणी सोमीने केली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

मात्र, यावेळी सोमीच्या या मागणीचं कारण वेगळं आहे. सोमी अली हिने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणाली की, ‘अनेक वर्षांनंतर मला या गोष्टी बोलण्यासाठी मला प्रवृत्त केले जात आहे. कारण सलमान खानने माझा डिस्कव्हरी प्लसवरील एक शो बंद करण्यास भाग पाडले आहे.’ यावेळी तिने पुन्हा एकदा सलमान खानवर अनेक आरोप केले आहेत.

सोमी अली म्हणाली की, ‘मी २० वर्षांनंतर आता या विषयावर मोकळेपणाने बोलत आहे, कारण सलमानने माझा शो बंद पाडून हे बोलण्यासाठी मला प्रवृत्त केले आहे. माझ्या या शोमधून मी ज्यांना मदतची गरज आहे, अशा लोकांसाठी काम करत होते. यात सहभागी होणारे ८२ टक्के लोक हे भारतीय होते. मात्र, सलमान खानने डिस्कव्हरी प्लसशी बोलून माझ्या या शोमध्ये अडथळे आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टी बोलत आहे. मी २० वर्षांपूर्वीच हा किस्सा माझ्या आयुष्यातून संपवला होता. पण, सलमानमुळेच या सगळ्या गोष्टी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.’

पुढे सोमी अली म्हणाली की, ‘या सगळ्या गोष्टी केल्यानंतर देखील सलमान सगळं नाकारतो आहे. त्याने स्वतःला आरशात पाहायला हवं. त्यानंतर त्याने सगळ्या गोष्टी बोलायला हव्यात. सलमान खानने माझ्यासोबत अनेक गोष्टी केल्या. पण, आता त्याने सर्वांसमोर माझी माफी मागून, माझ्या शोला परवानगी मिळवून दिली पाहिजे.’