मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Video: ‘बेशरम रंग’ गाण्यावर राणादाच्या ‘वहिनी साहेबां’चा भन्नाट बेली डान्स! व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

Video: ‘बेशरम रंग’ गाण्यावर राणादाच्या ‘वहिनी साहेबां’चा भन्नाट बेली डान्स! व्हिडीओ घालतोय धुमाकूळ

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 07, 2023 01:37 PM IST

Besharam Rang Viral Dance: ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये ‘नंदिता वहिनी’ अर्थात ‘वहिनीसाहेब’ हे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्रीने देखील ‘बेशरम रंग’वर ताल धरला आहे.

Madhuri Pawar
Madhuri Pawar

Madhuri Pawar Dance on Besharam Rang: बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट रिलीज व्हायला अवघे काही दिवस उरले आहे. मात्र, त्या आधीच हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आली असून, यातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्यात दीपिका आणि शाहरुख यांचा हटके लूक आणि सिजलिंग केमिस्ट्री पाहायला मिळाली आहे. आता या गाण्यावर ‘राणादा’च्या लाडक्या ‘वहिनीसाहेबां’नी देखील ठेका धरला आहे.

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये ‘नंदिता वहिनी’ अर्थात ‘वहिनीसाहेब’ हे पात्र साकारणारी अभिनेत्री माधुरी पवार हिने देखील ‘बेशरम रंग’वर ताल धरला आहे. ‘राणा दा’ आणि ‘पाठक बाई’ यांच्या जोडीसोबतच या मालिकेतील नंदिता वहिनी हे पात्र देखील तुफान गाजलं. मालिकेच्या सुरुवातीला हे पात्र अभिनेत्री धनश्री काडगाववर हिने साकारलं होतं. मात्र, धनश्री प्रसूती रजेवर गेल्यानंतर तिच्या जागी माधुरी पवार हिची वर्णी लागली. माधुरीने देखील या पात्रातून घराघरांत लोकप्रियता मिळवली. आता तिचा ‘बेशरम रंग’वरील डान्स पाहून चाहते स्तब्ध झाले आहेत.

अभिनेत्री असण्याबरोबरच माधुरी पवार एक उत्तर डान्सर देखील आहे. या आधी तिने एका नृत्यावर आधारित कार्यक्रमाचे विजेतेपद देखील पटकावले आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी माधुरी नेहमीच आपले डान्स व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. आता तिने ‘बेशरम रंग’ या गाण्यावर चक्क बेली डान्स केला आहे. तिच्या या बेली डान्सने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. भगव्या रंगाच्या आऊटफिटमध्येच माधुरीने हा बेली डान्स केला आहे. तिच्या अदा पाहून नेटकरी देखील फिदा झाले आहेत. नेटकरी देखील तिच्या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा ‘पठाण’ हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात जॉन इब्राहिम देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे.

IPL_Entry_Point

विभाग