मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Taaza Khabar Twitter Review: श्रिया अन् प्रथमेशच्या साथीने भुवन बामची धमाल! ‘ताजा खबर’ पाहून नेटकरी म्हणाले...

Taaza Khabar Twitter Review: श्रिया अन् प्रथमेशच्या साथीने भुवन बामची धमाल! ‘ताजा खबर’ पाहून नेटकरी म्हणाले...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 07, 2023 01:05 PM IST

Taaza Khabar Twitter Review: हटके विषय आणि वेगळं कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘ताजा खबर’ने ओटीटी विश्वात चांगलीच खळबळ माजवली आहे.

Taaza Khabar
Taaza Khabar

Taaza Khabar Twitter Review: युट्यूब विश्वाचा लाडका अभिनेता भुवन बाम याची नवी वेब सीरिज ‘ताजा खबर’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजमध्ये भुवनसोबत अभिनेत्री श्रिया पिळगावकर आणि अभिनेता प्रथमेश परब हे देखील मुख्य भूमिकेत झळकले आहेत. हटके विषय आणि वेगळं कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या ‘ताजा खबर’ने ओटीटी विश्वात चांगलीच खळबळ माजवली आहे. श्रिया आणि प्रथमेशच्या सोबतीने भुवन बाम याने देखील दमदार अभिनय केला आहे. ‘ताजा खबर’ पाहिल्यानंतर आता प्रेक्षक देखील आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

अवघ्या सहा भागांची ही वेब सीरिज क्राईम थ्रिलर असून, याची कथा वसंत नावाच्या तारुण्याच्या आयुष्याभोवती फिरते आहे. या सीरिजमध्ये ‘वसंत’ हे पात्र भुवन बाम याने साकारले आहे. झोपडपट्टीत राहणारा व्यास हा एका अशा चक्रात अडकतो की, पुढे तो एक गँगस्टर म्हणून ओळखला जाऊ लागतो. ‘ताजा खबर’ची कथा, पटकथा, पार्श्वसंगीत आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षक देखील मंत्रमुग्ध झाले आहेत. भुवन बामच्या चाहत्यांसोबतच, सोशल मीडिया युझर्स देखील या वेब सीरिजचं कौतुक करत आहेत.

एक युझरने लिहिले की, ‘नुकतीच ताजा खबर सीरिज पाहिली. या सीरिजमधील सगळीच पात्रे मनाला भिडणारी होती. भुवन भाई आणि टीमला सलाम.’ दुसर्‍या एका युझरने लिहिले की, ‘#hotstarspecials #TaazaKhabarचा ३रा भाग पाहत आहे आणि मी आता स्वतःला ट्विट करण्यापासून रोखू शकत नाहीये. ही सीरिज कमाल आहे.’ आणखी एका युझरने लिहिले की, ‘ताजा खबरमध्ये भुवन बाम एकदम कडक! याची कथा भुवनला साजेशी आहे. गिल्टी माईंड आणि मिर्झापूरनंतर पुन्हा एकदा श्रिया पिळगावकर कमाल वाटली आहे.’

‘ताजा खबर’ या वेब सीरिजची कथा एक शिकवण देणारी देखील आहे. भुवन बाम याने या वेब सीरिजमध्ये साकारलेला वसंत एक सफाई कामगार आहे. त्याच्या डोळ्यांत नेहमीच श्रीमंत होण्याचे स्वप्न असते. श्रीमंत बनून, त्याला त्याच्या आई आणि मैत्रिणीला मदत करायची आहे. ‘ताजा खबर’ ही सीरिज अशा लोकांना प्रोत्साहन देते, ज्यांना त्यांची स्वप्ने पूर्ण करायची आहेत.

IPL_Entry_Point