मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Shivali Parab: ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम शिवाली परबचं धमाल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला!

Mar 18, 2023, 08:03 AM IST

  • Shivali Parab New Song: सोशल मीडियावर सध्या विशाल राठोड आणि शिवाली परब यांची मुख्य भूमिका असलेले नवेकोरे मराठी अल्बम साँग ‘म्याड केलंय तू’ तुफान व्हायरल होत आहे.

Shivali Parab New Song

Shivali Parab New Song: सोशल मीडियावर सध्या विशाल राठोड आणि शिवाली परब यांची मुख्य भूमिका असलेले नवेकोरे मराठी अल्बम साँग ‘म्याड केलंय तू’ तुफान व्हायरल होत आहे.

  • Shivali Parab New Song: सोशल मीडियावर सध्या विशाल राठोड आणि शिवाली परब यांची मुख्य भूमिका असलेले नवेकोरे मराठी अल्बम साँग ‘म्याड केलंय तू’ तुफान व्हायरल होत आहे.

Shivali Parab New Song: सोशल मीडियावर सध्या विशाल राठोड आणि शिवाली परब यांची मुख्य भूमिका असलेले नवेकोरे मराठी अल्बम साँग ‘म्याड केलंय तू’ तुफान व्हायरल होत आहे. तांड्यातील मुलगा या नव्याकोऱ्या गाण्यात शिवालीसोबत चांगलाच धुमाकूळ घालतोय. विशाल राठोडसोबत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबला पाहणं रंजक ठरतंय.

ट्रेंडिंग न्यूज

स्वाती आणि इंद्राने मागितली मुक्ता हिची माफी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय घडणार जाणून घ्या

'बाईपण भारी देवा' सिनेमा घरबसल्या पाहायला? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कमल हासन यांच्या लेकीचा ब्रेकअप, काय आहे कारण?

‘आमच्या पप्पांनी गंपती आणला’ गाण्यामधील चिमुकला साईराज याचे नशीब फळफळले! दिसणार 'या’ मालिकेत

खानदेशातून असणाऱ्या विशालच्या कलेची जिद्द या गाण्यातून पडद्यावर रेखाटतेय. विशाल राठोडसोबत या गाण्यात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब झळकत असून, व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनलवर हे गाणे प्रदर्शित झाले आहे. 'म्याड केलंस तू' म्हणत प्रेमाची परिभाषा मांडणारे असे आणि तरुणाईला भुरळ पाडणारे हे अल्बम साँग रसिकांच्या दिलाचा ठोका चुकवायला सज्ज झाले आहे. १२ मार्चला या गाण्याचा टीझर आला होता, तेव्हापासून या गाण्याची चर्चा सुरू आहे. आता मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, हे गाणंही प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे.

या लव्हेबल प्रेमकहाणीला सागर जनार्दन याने संगीत दिलंय. तर, या गाण्याचे बोल सागर जनार्दन आणि रोहन साखरे यांनी शब्दबद्ध केले आहेत. हे रोमँटिक गाणे हर्षवर्धन वावरे आणि लरीसा अलमेडिया यांनी त्यांच्या सुमधुर आवाजात स्वरबद्ध केलंय. संपूर्ण गाण्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मनीष महाजन याने पेलवली आहे. तर, संपूर्ण गाण्याला छायाचित्रकार सूरज राजपूत याने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे. सीएम राठोड यांनी गाण्याच्या निर्मितीची बाजू उत्तमरीत्या पेलवली आहे. विशाल राठोड आणि शिवाली परब यांची लव्हेबल केमिस्ट्री या गाण्यात पाहणं उत्सुकतेच ठरतंय.

विशालने या आधी देखील उत्तम कलाकृती अशा मराठी सिनेक्षेत्रात दिल्या आहेत. १०हून अधिक सुपरहिट मराठी आणि बंजारा अल्बमसाठी विशालने अविरत मेहनत घेतली आहे. विशाल हा मूळचा वडगाव अंबे पाचोरा तालुक्याचा असून, त्याने सुरू केलेला अत्यंत मेहनतीचा प्रवास आजही तितक्याच ताकदीने विशाल पेलवत आहे. या गाण्यामुळे शेतकऱ्याच्या मुलाचं असणार सिनेसृष्टीविषयीचं स्वप्न नव्याने पूर्ण होताना दिसतंय. निर्मिती आणि अभिनय या सोबतच विशाल स्वतः एक व्यवसायिक आहे. एम.बी.ए फायनान्समध्ये शिक्षण पूर्ण केलेल्या विशालला कायमच चित्रपट क्षेत्र आणि नृत्याची आवड आहे.

 

विभाग