मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Farzi Twitter Review: शाहिद कपूर-विजय सेतूपतीच्या ‘फर्जी’ने जिंकलं चाहत्यांचं हृदय; पाहा नेटकरी काय म्हणतायत...

Farzi Twitter Review: शाहिद कपूर-विजय सेतूपतीच्या ‘फर्जी’ने जिंकलं चाहत्यांचं हृदय; पाहा नेटकरी काय म्हणतायत...

Feb 10, 2023, 03:53 PM IST

    • Farzi Twitter Review: अभिनेता शाहिद कपूर व्यतिरिक्त, या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय सेतुपती आणि के के मेनन सारख्या दमदार कलाकारांचाही समावेश आहे.
Farzi

Farzi Twitter Review: अभिनेता शाहिद कपूर व्यतिरिक्त, या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय सेतुपती आणि के के मेनन सारख्या दमदार कलाकारांचाही समावेश आहे.

    • Farzi Twitter Review: अभिनेता शाहिद कपूर व्यतिरिक्त, या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय सेतुपती आणि के के मेनन सारख्या दमदार कलाकारांचाही समावेश आहे.

Farzi Twitter Review: बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरने नुकतेच ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. शाहिद कपूरने त्याच्या 'फर्जी' या वेब सीरिजद्वारे ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. शाहिद कपूरची ‘फर्जी’ ही वेब सीरिज आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज झाली आहे. शाहिदच्या या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ट्विटरवर देखील चाहते ‘फर्जी’चे कौतुक करत आहेत. ‘फर्जी’ ही एक थ्रिलर वेब सीरिज आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल

गेल्या १० दिवसांपासून सोढी बेपत्ता, वडिलांनी सांगितले आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अभिनेता शाहिद कपूर व्यतिरिक्त, या वेब सीरिजमध्ये अभिनेता विजय सेतुपती आणि के के मेनन सारख्या दमदार कलाकारांचाही समावेश आहे. वेब सीरिजमध्ये शाहिद कपूर एका अशा कलाकाराची भूमिका साकारत आहे, जो स्वत:चे काहीतरी करण्याऐवजी नेहमीच इतर कलाकारांची कॉपी करत असतो. या वेब सीरिजमध्ये शाहिदही अतिशय हुशारीने सगळ्या गोष्टी कॉपी करताना दिसत आहे.

शाहिद कपूरच्या ‘फर्जी’ या चित्रपटाचे सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. ‘फर्जी’विषयी सांगताना एका यूजरने लिहिले की, 'शाहिद कपूरने फर्जीमध्ये जबरदस्त काम केले आहे. शाहिदच्या अभिनयाने नक्की भारावून जाल. ही एक धमाकेदार थ्रिलर वेब सीरिज आहे.’

यासोबतच आणखी एका युजरने लिहिले की, 'आत्ताच ‘फर्जी’ पाहिली, ही अतिशय दमदार वेब सीरिज आहे. विजय सेतुपतीने आपल्या अभिनयाने सर्वांना चकित केले आहे.’ शाहिद कपूरच्या अभिनयाबद्दल बोलताना एका यूजरने लिहिले की, 'शाहिद कपूरकडून नेहमीच असाच काहीसा अभिनय अपेक्षित होता, आज फर्जी पाहून खरंच मजा आली.’

‘फर्जी’मध्ये शाहिद कपूर, राखी खन्ना, अमोल पालेकर, के के मेनन आणि विजय सेतुपती अशी दमदार स्टारकास्ट आहेत. सोशल मीडियावर चाहते सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक करताना दिसत आहेत. ‘फर्जी’ या वेब सीरिजमध्ये एकूण ८ भाग आहेत आणि प्रत्येक भाग एक तासाचा आहे. एकूणच या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.