मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  P. K. Rosy : चित्रपटातील ‘त्या’ एका दृश्यामुळे लोकांनी जाळलं होतं पी.के. रोझी यांचं घर!

P. K. Rosy : चित्रपटातील ‘त्या’ एका दृश्यामुळे लोकांनी जाळलं होतं पी.के. रोझी यांचं घर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 10, 2023 02:55 PM IST

P. K. Rosy Google Doodle: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री पीके रोझी यांची आज १२०वी जयंती आहे. गुगलने आपल्या डूडल मार्फत या अभिनेत्रीचा सन्मान केला आहे.

PK Rosy
PK Rosy

P. K. Rosy Google Doodle: प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्री पीके रोझी यांची आज १२०वी जयंती आहे. गुगलने आपल्या डूडल मार्फत या अभिनेत्रीचा सन्मान केला आहे. पीके रोझी या मल्याळम चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. पीके रोझीचा जन्म १० फेब्रुवारी १९०३ रोजी तिरुअनंतपुरम येथे झाला होता. रोझी यांना लहान वयातच अभिनयाची आवड निर्माण झाली होती. पण, त्यावेळच्या समाजाने महिलांच्या कामाबाबत अनेक कडक नियम बनवले होते.

लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने पीके रोझी यांनी मोठे होऊन अभिनेत्री बनण्याचे ठरवले होते. आपले स्वप्न साकार करण्यासाठी पीके रोझी यांनी १९२८मध्ये मल्याळम चित्रपट ‘विगाथाकुमारन’मध्ये (द लॉस्ट चाईल्ड) मुख्य भूमिका करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर त्या सिनेविश्वात प्रसिद्ध झाल्या होत्या. 

अनेक सामाजिक बंधन झुगारून पीके रोझी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत अनेकांना प्रेरणा दिली. या चित्रपटात एक असा सीन होता, ज्यामध्ये हिरो रोझीच्या केसातील फुलाचे चुंबन घेतो. मात्र, हे दृश्य पाहून लोक प्रचंड संतापले होते. संतापलेल्या जमावाने रोझीचे घरही जाळले होते आणि त्यांना ही जागा सोडण्यास भाग पाडले होते.

या कठीण काळात आपला जीव वाचवण्यासाठी पीके रोझी यांनी तामिळनाडूकडे जाणार्‍या लॉरीतून पळ काढला होता. यानंतर त्यांनी लॉरी चालक केशवन पिल्लई यांच्याशीच विवाह केला आणि राजम्मल म्हणून पुढचे आयुष्य व्यतीत केले. त्यांना कधीही प्रसिद्धी मिळवण्याचा मोह नव्हता. त्याऐवजी त्यांनी आपले आयुष्य पुन्हा एकदा नव्याने जगण्यास सुरुवात केली. आता देखील मल्याळम चित्रपटसृष्टीतील महिला अभिनेत्रींनी एक सोसायटी स्थापित केली असून, याचे नाव ‘पीके रोझी फिल्म सोसायटी’ असे ठेवले आहे.

IPL_Entry_Point

विभाग