मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Mahesh Babu-Namrata Shirodkar: अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी महेश बाबू-नम्रता शिरोडकर स्वित्झर्लंडला रवाना!

Mahesh Babu-Namrata Shirodkar: अ‍ॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी महेश बाबू-नम्रता शिरोडकर स्वित्झर्लंडला रवाना!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 10, 2023 11:00 AM IST

Mahesh Babu-Namrata Shirodkar: अभिनेता महेश बाबू, त्याची पत्नी नम्रता शिरोडकरसोबत हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाले होते. साऊथची ही सुपरस्टार जोडी स्वित्झर्लंडला सुट्टी साजरी करण्यासाठी रवाना झाली आहे.

Mahesh Babu-Namrata Shirodkar
Mahesh Babu-Namrata Shirodkar

Mahesh Babu-Namrata Shirodkar: साऊथ सुपरस्टार महेश बाबू आणि त्याची पत्नी नम्रता शिरोडकर हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी त्यांच्या जोडीवर सगळ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या. यावेळी महेश बाबूने निळ्या रंगाचा स्वेट शर्ट आणि बेज पँट परिधान केली होती. यावेळी पत्नी नम्रता शिरोडकर देखील त्याच्यासोबत दिसली. साऊथ सुपरस्टार महेश बाबूचे सोशल मीडियावर खूप मोठे फॅन फॉलोअर आहेत. नेहमीच लाईम लाईटपासून दूर राहणारा महेश बाबू विमान तळावर स्पॉट झाल्यामुळे चर्चेत आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिनेता महेश बाबू, त्याची पत्नी नम्रता शिरोडकरसोबत हैदराबाद विमानतळावर स्पॉट झाले होते. साऊथची ही सुपरस्टार जोडी स्वित्झर्लंडला सुट्टी साजरी करण्यासाठी रवाना झाली आहे. महेश आणि नम्रता यांचे विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. महेश बाबूने त्याच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या निर्णय घेतला आहे.

अनेक दिवसांपासून महेश बाबू चित्रपट निर्माते त्रिविक्रम श्रीनिवाससोबत त्यांच्या आगामी तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. या चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण करून महेश बाबू सुट्टीसाठी रवाना झाले आहेत. विमानतळावरील अभिनेत्याचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहत्यांना महेश बाबूचा एअरपोर्ट लूक आवडला आणि अभिनेत्याची जोरदार प्रशंसा केली.

अभिनेता महेश बाबू आणि नम्रता यांनी पाच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. १० फेब्रुवारी २००५ रोजी दोघांनी सात फेरे घेत, जन्मभराची गाठ बांधली होती. एका मुलाखतीदरम्यान नम्रताने सांगितले होते की, तिला दोन वर्षांच्या डेटिंगनंतरच महेशशी लग्न करायचे होते, परंतु कामाच्या कमिटमेंटमुळे दोघांच्या लग्नाला पाच वर्षे लागली. २०००मध्ये 'वामसी' चित्रपटाच्या सेटवर दोघे पहिल्यांदा भेटले होते. शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांचे चांगले मित्र बनले आणि नंतर हळूहळू दोघांमध्ये जवळीक वाढू लागली होती. या चित्रपटाच्या सेटवरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. यानंतर त्यांनी लग्नगाठ बांधली.

IPL_Entry_Point

विभाग