मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan Watch: शाहरुख खानच्या निळ्या घड्याळावर खिळल्या नजरा; किंमत ऐकाल तर जागीच उडाल!

Shah Rukh Khan Watch: शाहरुख खानच्या निळ्या घड्याळावर खिळल्या नजरा; किंमत ऐकाल तर जागीच उडाल!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 10, 2023 02:16 PM IST

Shah Rukh Khan Watch Price:शाहरुख खानच्या स्टाईलवर चाहत्यांचं लक्ष नेहमीच टिकून असतं. मात्र, सध्या शाहरुख चर्चेत आला आहे तो त्याच्या घड्याळामुळे...

Shah Rukh Khan’s Watch
Shah Rukh Khan’s Watch

Shah Rukh Khan Watch Price: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या ‘पठाण’ या चित्रपटामुळे तुफान चर्चेत आहे. त्याचा ‘पठाण’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमी करत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने शाहरुख अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहे. शाहरुख खानच्या स्टाईलवर चाहत्यांचं लक्ष नेहमीच टिकून असतं. मात्र, सध्या शाहरुख चर्चेत आला आहे तो त्याच्या घड्याळामुळे... नुकतीच शाहरुख खान याने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्याने परिधान केलेल्या निळ्या रंगाच्या घड्याळावर सगळ्यांच्या नजरा खिळल्या होत्या.

बॉलिवूड किंग शाहरुख खान नेहमीच त्याच्या लक्झरी लाईफमुळे नेहमीच चर्चेत असतो. ‘पठाण’च्या निमित्ताने शाहरुखचे शर्ट्स आणि गॉगल्स चर्चेत आले होते. मात्र, आता त्याच्या हातातील घड्याळाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. शाहरुख खानच्या हातातील निळे घड्याळ पाहून अनेकांनी त्याची किंमत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शाहरुखच्या घड्याळाची किंमत कळल्यानंतर मात्र सगळेच हैराण झाले आहेत. शाहरुखच्या या घड्याळाची किंमत तब्बल ४.९८ कोटी रुपये इतकी आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानच्या हातातील हे निळे घड्याळ Royal Oak Perpetual Calendarचे असून याची किंमत तब्बल ४.९८ कोटी असल्याचे म्हटले जात आहे. या घड्याळाची किंमत ऐकून सगळेच हैराण झाले आहेत. सध्या शाहरुख खानचा ‘पठाण’ जगभरात गाजत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’ या चित्रपटाने १५ दिवसांत तब्बल ४५२.९५ कोटींची कमाई केली आहे. लवकरच हा चित्रपट ५०० कोटींचा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. 

‘पठाण’ चित्रपटाच्या धमाकेदार यशानंतर आता शाहरुख खानच्या हातात अनेक बिग बजेट चित्रपट आहेत. शाहरुख खान लवकरच ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. शाहरुख खानचे हे चित्रपट देखील यंदाच्या वर्षीच रिलीज होणार आहेत.  

IPL_Entry_Point