मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  PIFF: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाचा झेंडा; 'मदार' चित्रपटाने पटकावले पुरस्कार!

PIFF: पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपटाचा झेंडा; 'मदार' चित्रपटाने पटकावले पुरस्कार!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 10, 2023 12:03 PM IST

Pune International Film Festival: २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा 'मदार' या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवत महोत्सवावर आपली मोहोर उमटवली आहे.

Pune International Film Festival
Pune International Film Festival

Pune International Film Festival: २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा 'मदार' या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवत महोत्सवावर आपली मोहोर उमटवली आहे. तर, यंदाचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ्रान्स येथील 'तोरी अँड लोकिता' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. नुकताच हा पुरस्कार वितरण सोहळा पुण्यात पार पडला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

भारतातील प्रतिष्ठिती पुरस्कारांपैकी एक म्हणून पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे नाव घेतले जाते. या पुरस्कार सोहळ्यात जगभरातील अनेक देशांमधील चित्रपट सहभागी होतात. यंदा या पुरस्काराचे २१वे वर्ष असून, पुन्हा एकदा मराठी चित्रपटांचं वर्चस्व दिसून आलं आहे. २१व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा गुरुवारी मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे संपन्न झाला. या समारोप आणि पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे, पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे उपस्थित होते.

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाहीर झालेले आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार :

- स्पेशल ज्युरी मेंशन-बॉय फ्रॉम हेवन

- स्पेशल ज्युरी मेंशन अभिनेत्री-लुबना अझबल-ब्ल्यू काफ्तान

- प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-बेल्जियम आणि फ्रान्स येथील-तोरी अँड लोकिता

- प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक-मरिना गोर्बाक-क्लोंडिके

- एमआयटी-एसएफटी ह्युमन स्पिरीट-क्लोंडिके

 

मराठी चित्रपट पुरस्कार :

- अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेत्री - अमृता अगरवाल - मदार

- अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेता - मिलिंद शिंदे - मदार

- महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट - मदार

- अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - मंगेश बदर - मदार

- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बेस्ट सिनेमाटोग्राफर - आकाश बनकर आणि अजय बालेराव - मदार

- स्पेशल मेंशन ज्युरी टू द डायरेक्टर - कविता दातिर - अमित सोनवणे - गिरकी

- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ उत्कृष्ट पटकथा पुरस्कार - राहुल आवटे - पंचक

- स्पेशल मेंशन ज्युरी अवार्ड फॉर आर्ट डायरेक्टर - कुणाल वेदपाठक - डायरी ऑफ विनायक पंडित

IPL_Entry_Point