मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Farzi: शाहिद कपूर आणि विजय सेतुपतीसोबत दिसणार ही अभिनेत्री, नवा टीझर चर्चेत

Farzi: शाहिद कपूर आणि विजय सेतुपतीसोबत दिसणार ही अभिनेत्री, नवा टीझर चर्चेत

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 18, 2023 04:57 PM IST

Farzi Star Cast: ‘फर्जी’ या सीरिजच्या माध्यमातून शाहिद कपूर डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. या सीरिजमध्ये आता त्याच्यासोबत कोणती अभिनेत्री दिसणार हे स्पष्ट झाले आहे.

फर्जी
फर्जी (HT)

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर हा चित्रपटसृष्टी पासून आहे. २०२२ साली शाहिदचा 'जर्सी' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर शाहिद आता वेब विश्वात पदार्पण करत आहे. तो 'फर्जी' या वेब सीरिजमध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपतीसोबत दिसणार आहे. आता या सीरिजमध्ये कोणती अभिनेत्री दिसणार हे समोर आहे.

अलीकडेच, 'फर्जी' या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यापाठोपाठ आता मेघा नावाची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या राशी खन्नाचा एक रोमांचक कॅरेक्टर व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे. या टीझरमध्ये राशीच्या व्यक्तिरेखेची झलक दिसत असून, एक मजबूत आणि आत्मविश्वासपूर्ण स्त्री देशातून बनावटगिरी दूर करण्यासाठी सुपरकॉप मायकेलची व्यक्तिरेखा साकारत असलेल्या विजय सेतुपतीसह सामील होऊन कॉन आर्टिस्ट शाहिद कपूरला पकडण्यासाठी कोणतीही कसर सोडत नसल्याचे पाहायला मिळते.
वाचा: त्याने माझ्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकलं अन्..; रश्मी देसाईने सांगितला धक्कादायक अनुभव

फर्जी या सीरिजमध्ये शाहिद कपूर सनी हे पात्र साकारणार आहे. तर विजय सेतुपती माइक नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन राज आणि डिके यांनी केले आहे. ही आठ भागांची सीरिज अॅमेझॉनप्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. विजय आणि शाहिदसोबत सीरिजमध्ये के के मेनन, राशी खन्ना, अमोल पालेकर आणि कुब्रा सैत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ही एक क्राइम थ्रिलर सीरिज आहे.

IPL_Entry_Point

विभाग