मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rashmi Desai:त्याने माझ्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकलं अन्..; रश्मी देसाईने सांगितला धक्कादायक अनुभव

Rashmi Desai:त्याने माझ्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकलं अन्..; रश्मी देसाईने सांगितला धक्कादायक अनुभव

Aarti Vilas Borade HT Marathi
Jan 17, 2023 01:50 PM IST

Rashmi Desai : अभिनेत्री रश्मी देसाईने एका मुलाखतीमध्ये हा धक्कादायक खुलासा केला आहे.

रश्मी देसाई
रश्मी देसाई (HT)

अनेक अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीच्या काळात कठीण काळातून जावे लागते. कधी त्यांना कास्टिंग काऊचचा अनुभव येतो तर काहींना नकार पचवावा लागतो. अशातच छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री रश्मी देसाईने मोठा खुलासा केला आहे. तिने एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

टीव्ही विश्वात रश्मी देसाई हे नाव खूप मोठे आहे. करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला होता. आता तिने एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे. 'एका व्यक्तीने मला फोन करु ऑडिशनसाठी बोलावले होते. मी तेथे पोहोचले तर कोणीच नव्हते. मी एकटी होते. त्याने माझ्या ड्रिंकमध्ये नशेचं औषध टाकलं आणि माझ्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. मला जेव्हा जाणवलं तेव्हा मी तेथून बाहेर पडले' असे रश्मी देसाई म्हणाली.
वाचा: अमृता खानविलकर की सोनाली कुलकर्णी; कोण असेल महाराष्ट्राची फेव्हरेट अभिनेत्री?

समोर आलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या दिवशी रश्मी देसाईच्या आईने त्या व्यक्तीला शोधून काढले आणि त्याला मारहाण केली. त्यानंतर हळूहळू रश्मीला काही मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. रश्मीने काही रिअॅलिटी शोमध्ये काम केले आहे. तसेच काही भोजपूरी चित्रपटांमध्ये ही ती दिसली होती.

IPL_Entry_Point

विभाग