मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: कार्तिक दीपाची माफी मागणार! पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात होणार का?

Rang Maza Vegla: कार्तिक दीपाची माफी मागणार! पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात होणार का?

May 15, 2023, 06:59 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आता कार्तिकला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी कार्तिकला देखील त्याची चूक उमगणार आहे.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आता कार्तिकला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी कार्तिकला देखील त्याची चूक उमगणार आहे.

  • Rang Maza Vegla Latest Episode: दीपा आता कार्तिकला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी कार्तिकला देखील त्याची चूक उमगणार आहे.

Rang Maza Vegla Latest Episode: रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता पुन्हा एकदा दीपा आणि कार्तिक यांच्या नव्या नात्याची सुरुवात होताना दिसणार आहे. कार्तिकचं वागणं आणि त्यामागचे त्याचे विचार ऐकून आता दीपाला धक्का बसला आहे. आपल्याला दीपामुळे १४ वर्षांची शिक्षा भोगावी लागली होते, हे त्याच्या मनात असल्याने तो दीपाचा बदला घेत होता. मात्र, त्याचा हा सगळा खेळ आता दीपासमोर उघडा पडला आहे. कार्तिकच्या वागण्यातला बदल दीपाला वारंवार कळत होता. मात्र, तिच्यावर कुणीच विश्वास ठेवायला तयार नव्हतं. परंतु, आता दीपासमोर कार्तिकचा खरा चेहरा आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

लाइव्ह कॉन्सर्टमध्ये सुनिधी चौहानवर चाहत्याने फेकली पाण्याची बाटली, गायिकेने व्यक्त केला संताप

मुंबईत मराठी माणूस चालणार नाही?; दिग्दर्शक अक्षय इंडिकर याची संतप्त पोस्ट व्हायरल

गेल्या १० दिवसांपासून सोढी बेपत्ता, वडिलांनी सांगितले आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं

Kshitij Zarapkar Passed Away: मराठी अभिनेते क्षितिज झारापकर यांचं निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अयशस्वी

कार्तिक आपल्यावर प्रेम नाही तर, आपला तिरस्कार करतो, हे सत्य तिला कळलं आहे. त्यामुळे आता दीपा स्वतः कार्तिकला त्याच्या जुन्या आयुष्यात परत आणण्याचा प्रयत्न करणार आहे. दीपाच्या बोलण्यामुळे आपलं सत्य तिला कळलं हे कार्तिकच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता त्याला देखील मोठा धक्का बसला आहे. आपण वेडे झालो नसून, हा कार्तिकचा प्लॅन असल्याचे दीपाला कळले होते. कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसत आहे. त्यामुळे दीपा कार्तिकचा खेळ आता त्याच्यावरच उलटवणार आहे. दीपावर आपलं किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी कार्तिक तिला बाहेर फिरायला घेऊन गेला आहे. मात्र, दीपा त्याचा खेळ आधीच ओळखून आहे.

दीपा आता कार्तिकला या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी कार्तिकला देखील त्याची चूक उमगणार आहे. तर, तो दीपाची माफी मागून मागतील पूर्वग्रह दूर करणार आहे. मात्र, आता कार्तिकला दीपा माफ करणार का? आणि ते दोघे पुन्हा एकदा त्यांच्या संसाराची नव्याने सुरुवात करणार का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.