मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Ghar Banduk Biryani: आता ओटीटीवरही पाहता येणार ‘घर बंदूक बिरयानी’; पाहा कधी आणि कुठे होणार रिलीज

Ghar Banduk Biryani: आता ओटीटीवरही पाहता येणार ‘घर बंदूक बिरयानी’; पाहा कधी आणि कुठे होणार रिलीज

May 23, 2023, 12:27 PM IST

  • Ghar Banduk Biryani OTT Release: नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर या जोडीचा सुपरहिट चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’ आता घर बसल्या पाहता येणार आहे.

Ghar Banduk Biryani

Ghar Banduk Biryani OTT Release: नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर या जोडीचा सुपरहिट चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’ आता घर बसल्या पाहता येणार आहे.

  • Ghar Banduk Biryani OTT Release: नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर या जोडीचा सुपरहिट चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’ आता घर बसल्या पाहता येणार आहे.

Ghar Banduk Biryani OTT Release: नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर या जोडीचा सुपरहिट चित्रपट ‘घर बंदूक बिरयानी’ आता घर बसल्या पाहता येणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या जागतिक डिजिटल प्रीमियरची घोषणा करण्यात आली आहे. बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या यशानंतर हा मराठी सिनेमा जगभरातील प्रेक्षकांसाठी १९ मे २०२३पासून ‘झी५’वर रिलीज करण्यात आला आहे. तेव्हा आता प्रेक्षकांना हा चित्रपट घरात बसून पाहता येणार आहे. झी स्टुडिओज आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे यांची निर्मिती असलेल्या घर बंदूक बिरयानी या सिनेमातून दिग्दर्शक हेमंत अवताडे यांनी पर्दापण केलं आहे. या सिनेमात नागराज मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील मुख्य भूमिकेत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

‘घर बंदुक बिरयानी’ हा सिनेमा बंडखोरांचं वर्चस्व असलेल्या कोलागडच्या काल्पनिक परिसरात घडतो. कमांडर पल्लम (सयाजी शिंदे) आणि त्यांचे बंडखोर जंगलात लपून तिथल्या आमदाराचा बदला घेण्याचा कट रचत असतात. जवळच्याच गावात राजू (आकाश ठोसर) त्याची भावी पत्नी लक्ष्मीला (सायली पाटील) भेटणार असतो. लग्नासाठी तिच्या वडिलांची एकच अट असते आणि ती म्हणजे, मुलाकडे स्वतःचं घर हवं. गावातल्याच एका ढाब्यावर काम करणाऱ्या राजूसाठी सगळ्यात चवदार बिरयानी बनवणं एकवेळ सोपं असतं, पण घर घेणं तितकंच अवघड असतं.

Ray Stevenson: ‘आरआरआर’ फेम प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन; राजमौलींनी व्यक्त केला शोक!

या सगळ्यापासून दूर राया पाटील (नागराज मंजुळे) पुण्यात आपलं कर्तव्य इमानइतबारे करत असतो, पण त्याचमुळे तो अडचणीत येतो. त्याची बदली होते, ती थेट कोलागडमध्ये. एका क्षणी या तिघांचं आयुष्य समान बिंदूवर येतं. ते कसं याची गोष्ट घर बंदूक बिरयानी या सिनेमात मनोरंजक आणि धमाल पद्धतीनं उलगडण्यात आली आहे.

नाट्यमय घडामोडी आणि उंदीर- मांजराच्या पाठलागाप्रमाणे रंगणाऱ्या घर बंदूक बिरयानीमध्ये प्रेम, विरह, नुकसान अशा सगळ्या भावना मांडण्यात आल्या आहेत. या धमाकेदार विनोदी व अ‍ॅक्शन सिनेमात सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांना घरात बसून पाहता येणार असल्याने, चाहते देखील आतुर झाले आहेत.

विभाग