मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anurag Kashyap: खरंच चियान विक्रमने ‘केनेडी’साठी अनुराग कश्यपला उत्तर दिलं नाही? अभिनेता म्हणतो...

Anurag Kashyap: खरंच चियान विक्रमने ‘केनेडी’साठी अनुराग कश्यपला उत्तर दिलं नाही? अभिनेता म्हणतो...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 23, 2023 10:08 AM IST

Anurag Kashyap And Chiyaan Vikram: अनुराग कश्यपने नुकताच खुलासा केला होता की, त्याला 'केनेडी' चित्रपटात तमिळ स्टार चियान विक्रमला साईन करायचे होते. मात्र, त्यावर चियानने उत्तर दिले नव्हते.

Anurag Kashyap And Chiyaan Vikram
Anurag Kashyap And Chiyaan Vikram

Anurag Kashyap And Chiyaan Vikram: बॉलिवूड चित्रपट निर्माता अनुराग कश्यपने नुकताच खुलासा केला होता की, त्याला 'केनेडी' चित्रपटात तमिळ स्टार चियान विक्रमला साईन करायचे होते. यासाठी त्याने चियान विक्रम याच्याशी संपर्क साधण्याचाही प्रयत्न केला. मात्र, अभिनेत्याने त्याला काहीच प्रतिसाद दिला नाही, असे अनुराग म्हटले होते. मात्र, अनुरागच्या या दाव्यावर आता चियानं आता मौन सोडलं आहे. यासोबतच त्याने आता ट्विट करून यावर भाष्य केलं आहे.

चियान विक्रमने त्याच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे. यात त्याने म्हटले की, त्याने एका वर्षापूर्वी अनुराग कश्यपला फोन केला होता आणि त्याला चित्रपट निर्मात्याकडून कोणताही मेल किंवा संदेश कसा आला नाही, हे सांगितले होते. याशिवाय चियानने अनुराग कश्यपला त्याच्या भविष्यातील प्रोजेक्ट्ससाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चियान विक्रमने अनुराग कश्यपला एक मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, ‘प्रिय अनुराग, सोशल मीडियावरील मित्र आणि हितचिंतकांसाठी, माझे आणि तुमचे एक वर्ष जुने संभाषण पुन्हा सांगत आहे. मी एका अभिनेत्याकडून ऐकले होते की, तुम्ही एका चित्रपटासाठी माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहात आणि तुम्हाला वाटतेय की, मी प्रतिसाद देत नाही. मग, मी लगेच तुम्हाला फोन केला.

Aditya Singh Rajput: आदित्य सिंह राजपूतच्या शरीरावर जखमा; अभिनेत्यासोबत नेमकं घडलं तरी काय?

चियान विक्रमने पुढे लिहिले की, 'मी तेव्हाच तुम्हाला सांगितले की, मला तुमच्याकडून कोणताही मेल किंवा मेसेज आलेला नाही. कारण तुम्ही ज्या ई-मेल आयडीवर माझ्याशी संपर्क साधला होता, तो सक्रिय नव्हता आणि माझा फोन नंबरही दोन वर्षांपूर्वी बदलला होता. मी तुम्हाला फोन कॉलवर सांगितल्याप्रमाणे, मी तुमच्या केनेडी चित्रपटासाठी खूप उत्सुक होतो. आतातर मी त्यापेक्षाही जास्त उत्साहित आहे, कारण तो चित्रपट माझ्या नावाशी जोडला गेला आहे. भविष्यासाठी शुभेच्छा, खूप खूप प्रेम, चियान विक्रम उर्फ केनेडी.’

सनी लिओन आणि राहुल भट्ट स्टारर 'केनेडी' हा चित्रपट 'कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२३'च्या मिडनाईट स्क्रीनिंग सेक्शन अंतर्गत प्रदर्शित केला जाईल. यावेळी अनुराग कश्यपने खुलासा केला की, या चित्रपटात त्याला राहुल भट्टऐवजी चियान विक्रमला कास्ट होते. त्याने चियान विक्रमला डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्ट लिहिली होती. मात्र, चियानने त्याच्या कॉल-मेसेजला प्रतिसाद दिला नाही, ज्यामुळे त्याने या भूमिकेसाठी राहुल भट्टची निवड केली.

IPL_Entry_Point

विभाग