मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Suhana Khan: शाहरुख खानच्या लाडक्या लेकीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? नक्की वाचा...

Suhana Khan: शाहरुख खानच्या लाडक्या लेकीबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का? नक्की वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 23, 2023 08:42 AM IST

Suhana Khan Lifestyle: चंदेरी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी सुहानाने स्वतःला एक अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे.

Suhana Khan
Suhana Khan

Suhana Khan Lifestyle: बॉलिवूड किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान याच्या लाडक्या लेकीने म्हणजेच सुहाना खान हिने नुकताच तिचा २३वा वाढदिवस साजरा केला आहे. सुहाना ही बॉलिवूडची लाडकी स्टार किड आहे. झोया अख्तर दिग्दर्शित 'द आर्चीज'मधून सुहाना खान यावर्षी अभिनयात पदार्पण करणार आहे. सुहानाचे चाहते तिला या चित्रपटात पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. सुहानाची सोशल मीडियावरही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अनेक कारणांमुळे शाहरुखची लाडकी भविष्यातील सुपरस्टार मानली जात आहे.

सुहाना खान एका फिल्मी कुटुंबातून पुढे आली आहे. लहानपणापासूनच तिच्याभोवती चित्रपटाची पार्श्वभूमी आहे. अशा परिस्थितीत फिल्म इंडस्ट्री कशी चालते, हे सुहानाला आधीच माहित आहे. हीच गोष्ट तिला इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी मदत करणार आहे. सुहाना कधीच सोशल मीडियाकडे दुर्लक्ष करत नाही. त्याऐवजी, ती तिच्या चाहत्यांसाठी नेहमीच नवनवे फोटो शेअर करत असते. इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्यापूर्वीच सुहानाचे ३.८ मिलियन फॉलोअर्स आहेत. सुहाना तिच्या बेधडक शैलीत ट्रोलर्सना उत्तर देण्यासाठी देखील प्रसिद्ध आहे.

Anupam Kher: चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेर जखमी; खांद्याला झाली मोठी दुखापत!

चंदेरी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी सुहानाने स्वतःला एक अभिनेत्री म्हणून सिद्ध केले आहे. अमेरिकेत उच्च शिक्षण घेत असताना सुहानाने ‘द ग्रे पार्ट ऑफ ब्लू’ या शॉर्ट फिल्ममध्ये काम केले. तिचा हा चित्रपट त्याच्या कॉलेजसाठी शूट करण्यात आला होता. यातही सुहानाने आपल्या दमदार अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. या चित्रपटाच्या काही क्लिप सोशल मीडियावर समोर आल्या, तेव्हा त्या खूप व्हायरल झाल्या होत्या.

वयाच्या अवघ्या २२ वर्षांतच सुहाना खानला तिच्या पहिल्या मेकअप ब्रँड एंडोर्समेंटमध्ये एन्ट्री मिळाली आहे. तिचा आत्मविश्वास आणि बोलण्याने लोकांच्या हृदयात तिचे एक वेगळे स्थान निर्माण झाले आहे. सुहाना आता अधिक आत्मविश्वासाने बोलताना दिसते. तिने नेहमीच स्वतःच्या पायावर आणि स्वतःच्या हिंमतीवर मनोरंजन क्षेत्रात येण्याच धाडस दाखवलं आहे. तिच्या या गुणांचं कौतुक स्वतः शाहरुख खानने देखील केलं आहे, त्यामुळे भविष्यात सुहाना देखील वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत सुपरस्टार होणार, हे चित्र आतापासूनच दिसत आहे.

IPL_Entry_Point

विभाग