मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Anupam Kher: चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेर जखमी; खांद्याला झाली मोठी दुखापत!

Anupam Kher: चित्रपटाच्या सेटवर अनुपम खेर जखमी; खांद्याला झाली मोठी दुखापत!

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 23, 2023 08:03 AM IST

Anupam Kher Injured : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती त्यांनी स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे.

Anupam Kher
Anupam Kher

Anupam Kher Injured : बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आगामी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती त्यांनी स्वत: त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून चाहत्यांना दिली आहे. आगामी चित्रपट 'विजय ६९'च्या शूटिंगदरम्यान अभिनेते अनुपम खेर जखमी झाले आहेत. त्याच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अनुपम खेर हाताला बँडेज केलेले दिसत आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

या फोटोत अनुपम यांनी हातात बॉल धरलेला दिसतो आहे आणि ते कॅमेरासमोर पोज देताना हसत आहेत. या पोस्टमध्ये अनुपम खेर यांनी लिहीले की, खांद्याच्या दुखापतीमुळे त्यांना खूप वेदना होत आहेत. यासोबतच शाहरुख खान आणि हृतिक रोशनवर उपचार करणाऱ्या डॉक्टरनेच त्यांच्यावर उपचार केल्याचे देखील सांगितले आहे. अनुपम खेर यांच्या या पोस्टवर आता चाहते त्यांना लवकर बरे वाटावे म्हणून प्रार्थना करताना दिसत आहेत.

Tejaswini Pandit Birthday: मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या तेजस्विनी पंडितने लावणीचे प्रयोग करून केला होता उदरनिर्वाह!

अनुपम खेर यांनी कॅप्शन लिहिले आहे, 'तुला स्पोर्ट्स फिल्म करायच्यात आणि दुखापत होणार नाही हे कसं शक्य आहे!! काल 'विजय ६९'च्या शूटिंगदरम्यान माझ्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. वेदना होतात, पण खांद्यावर स्लिंग लावणाऱ्या व्यक्तीने जेव्हा शाहरुख खान आणि हृतिक रोशन यांच्या खांद्याला देखील स्लिंग लावल्याचे सांगितले, तेव्हा वेदना थोडी कमी झाली! पण जर मला थोडा जोरात खोकला आला, तर माझ्या तोंडातून एक किंकाळी नक्कीच येते!'

अनुपम खेर यांनी पुढे लिहिले, 'फोटोमध्ये हसण्याचा प्रयत्न खरा आहे! दोन दिवसांनंतर शूटिंग सुरू करणार आहे. तसे, आईने ते ऐकले तेव्हा ती म्हणाली, आणखी स्वतःची बॉडी लोकांना दाखव! त्यौलेच नजर लागली आहे. त्यावर मी उत्तर दिले की, 'आई! युद्धाच्या मैदानात फक्त योद्धेच पडतात. गुडघ्यावर चालणारे कसे पडतील! हे बोलल्यावर मी आईकडून थप्पड खाता खाता वाचलो.’

IPL_Entry_Point

विभाग