मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Oscar 2023: यंदाचा ऑस्कर भारतासाठी ठरला खास! 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला पुरस्कार

Oscar 2023: यंदाचा ऑस्कर भारतासाठी ठरला खास! 'नाटू नाटू' गाण्याने जिंकला पुरस्कार

Aarti Vilas Borade HT Marathi

Mar 13, 2023, 09:32 AM IST

  • Oscar for Naatu Naatu Song : लॉस एंजलिस इथं झालेल्या ९५व्या ऑस्कर सोहळ्यावर भारताची मोहोर उमटली आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासाठी भारताला ऑस्कर मिळाला आहे.

ऑस्कर २०२३ (HT)

Oscar for Naatu Naatu Song : लॉस एंजलिस इथं झालेल्या ९५व्या ऑस्कर सोहळ्यावर भारताची मोहोर उमटली आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासाठी भारताला ऑस्कर मिळाला आहे.

  • Oscar for Naatu Naatu Song : लॉस एंजलिस इथं झालेल्या ९५व्या ऑस्कर सोहळ्यावर भारताची मोहोर उमटली आहे. ‘आरआरआर’ या चित्रपटातील नाटू नाटू गाण्यासाठी भारताला ऑस्कर मिळाला आहे.

Naatu Naatu wins Best Original Song Oscar 2023 : ऑस्कर २०२३च्या धमाकेदार सोहळ्याची सुरुवात आज सकाळी झाली आहे. चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा हा पुरस्कार सोहळा आहे. जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात RRR या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला नॉमिनेशन मिळाले होते. आता या गाण्याला ऑस्कर मिळाल्याचे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

'RRR' या चित्रपटातील नाटू नाटू गाण्याला 'बेस्ट ओरीजनल सॉंग' या श्रेणीत नामांकन मिळाले होते. आता या गाण्याने ऑस्कर जिंकल्याचे समोर आहे. भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे. सर्वत्र या गाण्याची चर्चा सुरु असताना हा गाण्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ऑस्कर सोहळ्याच्या सुरुवातीला देखील सूत्रसंचालक जीमीने देखील या गाण्यावर मोनोलॉग परफॉर्म केला होता.

एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, ‘नाटू नाटू’ हे गाणे एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणे गायक काला भैरव आणि राहुल यांनी गायले आहे. त्यांच्या या गाण्याने आता ऑस्कर जिंकत सर्वांच्या माना अभिमानाने उंचावल्या आहेत.

यंदाचा ९५वा ऑस्कर सोहळा हा लॉस एंजेलिस येथे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर मिळाले आहेत. बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फिल्म या ऑस्कर पुरस्काराच्या श्रेणीत भारताच्या 'द एलिफंट व्हिस्पर्स'ने बाजी मारली आहे. त्यापाठोपाठ 'आरआरआर' या चित्रपटातील 'नाटू नाटू' गाण्याला बेस्ट ओरिजनल साँग या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. ही भारतीयासाठी अभिमानास्पद बाब आहे.

विभाग