Oscar Award Trophy : चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात मानाचा सजमला जाणारा पुरस्कार सोहळा म्हणजे 'ऑस्कर.' जगभरातील कलाकार या पुरस्कार सोहळ्याची आतुरतेने वाट पाहात असतात. या पुरस्कार सोहळ्यात विजेत्या कलाकाराला एक ट्रॉफी दिली जाते. ही सोनेरी बाहुली मिळवण्याचा अनेक कलाकारांचा प्रयत्न असतो. पण ही सोनेरी बाहुली खरंंच सोन्याची असते का? त्या ट्रॉफीची किंमत किती रुपये आहे? असा प्रश्न अनेकांना पडतो.
ऑस्कर पुरस्कार सोहळा आजोजित केल्यानंतर त्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात. यंदा या पुरस्काराचे ९४ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लॉस एंजेलिसमध्ये हा पुरस्कार सोहळा पार पडला.
वाचा: भारताने बेस्ट डॉक्युमेंट्री शार्ट फ्लिम या श्रेणीत मारली बाजी
रिपोर्सट्स नुसार, ऑस्कर विजेत्या कलाकाराला मिळालेली सोनेरी रंगाची बाहुली ही तांब्याची असते. त्यावर २४ कॅरेट सोन्याचा एक थर दिला जातो. पण दुसऱ्या महायुद्धानंतर धातूंची कमतरता भासू लागली होती. त्यामुळे ही ट्रॉफी प्लॅस्टरमध्ये तयार करण्यास सुरुवात करण्यात आली. या ट्रॉफीची किंमत ४०० डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार जवळपास ३० हजार रुपये.
संबंधित बातम्या