मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shehzada Collection: ‘शहजादा’ बॉक्स ऑफिसवर गारठला; दुसऱ्या दिवशीच्या कमाईचा आकडा पाहिलात?

Shehzada Collection: ‘शहजादा’ बॉक्स ऑफिसवर गारठला; दुसऱ्या दिवशीच्या कमाईचा आकडा पाहिलात?

Feb 19, 2023, 01:29 PM IST

    • Shehzada Box Office Collection Day 2: सध्या चाहत्यांमध्ये जरी कार्तिकची हवा असली, तरी बॉक्स ऑफिसवर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.
Shehzada Box Office Collection

Shehzada Box Office Collection Day 2: सध्या चाहत्यांमध्ये जरी कार्तिकची हवा असली, तरी बॉक्स ऑफिसवर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

    • Shehzada Box Office Collection Day 2: सध्या चाहत्यांमध्ये जरी कार्तिकची हवा असली, तरी बॉक्स ऑफिसवर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे.

Shehzada Box Office Collection Day 2: बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आणि तरुणाईचा 'आयकॉन' असलेला अभिनेता कार्तिक आर्यन याचा ‘शहजादा’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. सध्या चाहत्यांमध्ये जरी कार्तिकची हवा असली, तरी बॉक्स ऑफिसवर मात्र वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. ‘भूल भुलैय्या २’नंतर कार्तिक आर्यनकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, आता ‘शहजादा’चं कलेक्शन पाहता चाहत्यांचा देखील भ्रमनिरास झाल्यासारखे वाटत आहे. आता ‘शहजादा’चे दुसऱ्या दिवशीचे कलेक्शन समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्मिता तांबे घडवणार शेतकऱ्यांच्या जगण्याचं दर्शन! शेतकऱ्याची व्यथा सांगणाऱ्या ‘कासरा’चा ट्रेलर पाहिलात का?

रोमान्स ते क्राईम; आठवडाभर ओटीटीवर असणार धुमाकूळ! पाहा काय काय होतंय रिलीज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

कार्तिक सध्या त्याच्या 'शहजादा' चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत क्रिती सेननही मुख्य भूमिकेत आहे. ‘शहजादा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी कार्तिकने त्याचे जोरदार प्रमोशन केले होते. इतकेच नाही तर, 'शहजादा'चा ट्रेलर दुबईतील बुर्ज खलिफावरही दाखवण्यात आला होता. पहिल्या दिवशी या चित्रपटाने अवघ्या ६ कोटींचा व्यवसाय केला होता. तर, दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट अवघ्या ७ कोटींची कमाई करू शकला आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने अवघ्या १२-१३ कोटींचा व्यवसाय केला आहे.

कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ देशभरात ३००० हजारांहून अधिक स्क्रीन्सवर रिलीज झाला आहे. 'भूल भुलैया २'च्या यशानंतर कार्तिककडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. ‘शहजादा’ हा चित्रपट 'भूल भुलैया २'च्या ओपनिंग डे कलेक्शनच्या निम्मीही कमाई करू शकलेला नाही. हॉलिवूड चित्रपट ‘अँटमॅन ३‘ने ‘शहजादा’पेक्षा जास्त कलेक्शन केले आहे. या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करणाऱ्या कार्तिक आर्यनने तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने त्याचाही काहीसा परिणाम या कलेक्शनवर झाला आहे.

कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा चित्रपट अल्लू अर्जुनचा साऊथ चित्रपट ‘अलवैकुंठपुरम’चा रिमेक आहे. रोहित धवनने याचे दिग्दर्शन केले आहे. कार्तिक आणि क्रितीशिवाय या चित्रपटात परेश रावल, मनीषा कोईराला आणि रोनित रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘लुकाछुपी’नंतर पुन्हा एकदा कार्तिक-क्रितीची ही जोडी मोठ्या पडद्यावर अप्रतिम दिसत आहे.