मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Famous Poster Out: एक फुल अन् दोन माळी; 'फेमस' चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अ‍ॅक्शनचा तडका!

Famous Poster Out: एक फुल अन् दोन माळी; 'फेमस' चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार अ‍ॅक्शनचा तडका!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2023 09:38 AM IST

Famous Poster Out: मराठी मनोरंजन विश्वात देखील सध्या अ‍ॅक्शन चित्रपटांचा भर पाहायला मिळत आहे. यातच आता आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Famous Marathi Movie
Famous Marathi Movie

Famous Poster Out: मराठी मनोरंजन विश्वात देखील सध्या अ‍ॅक्शन चित्रपटांचा भर पाहायला मिळत आहे. यातच आता आणखी एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अक्षय नागनाथ गवसाने दिग्दर्शित 'फेमस' हा नवाकोरा अ‍ॅक्शन आणि रोमँटिक चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. निर्माते मनोज गवळी, आशिष गुंजेकर, महेश संजय गायकवाड, अंकित बजाज, अक्षय नागनाथ गवसाने यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा पेलवली असून, या चित्रपटात अभिनेता महेश गायकवाड आणि स्वरूप सावंत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

नुकत्याच लाँच झालेल्या 'फेमस' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये पाहायला मिळतंय की, दोन प्रमुख अभिनेत्यांमध्ये एक नायिका उभी आहे. अर्थात पोस्टर पाहून असा अंदाज वर्तविण्यात येत आहे की, नायिकेसाठीची मुख्य कलाकारांमध्ये झटापट रंगणार आहे. मात्र ही पाठमोरी नायिका कोण आहे, याचा प्रत्येकजण अंदाज लावतोय. चित्रपटातील मुख्य नायिकेची झलक पाहण्यासाठी आता साऱ्यांचीच उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. प्रेक्षकांची ही उत्सुकता आणखी काही दिवस अशीच राहणार आहे.

चित्रपटाबाबत बोलताना चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अक्षय नागनाथ गवसाने असे म्हणाले की, ‘चित्रपटसृष्टी आणि आमचं अगदी जवळचं नातं आहे. कारण चित्रपटसृष्टीत आमचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे, त्यामुळे चित्रपट निर्मिती करताना कोणत्या अडचणी येतात, चित्रपट कसा बनतो हे आम्ही अगदी जवळून पाहिलं होतं. दरम्यान कॅटरिंगचे काम करताना पडद्यामागील तांत्रिक गोष्टी आवड म्हणून शिकत ही होतो. त्यावेळी मनात मी एक निश्चय केला की, एक दिवस आपण ही चित्रपटाची निर्मिती करायची. आणि अखेर आज तो दिवस आलाय, वडिलांना आणि घरच्यांना दिलेला शब्द आज पूर्ण होतोय, हा चित्रपट निखळ मनोरंजन आणि अ‍ॅक्शन थ्रिलरने भरलेला आहे. तुम्हा रसिक प्रेक्षकांचा आशीर्वाद फक्त पाठीशी ठेवा.’

IPL_Entry_Point