मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  TMKOC: ‘तारक मेहता...’च्या नव्या ‘टप्पू’ची होतेय जुन्याशी तुलना; अभिनेता नितीश भालुनी म्हणाला...

TMKOC: ‘तारक मेहता...’च्या नव्या ‘टप्पू’ची होतेय जुन्याशी तुलना; अभिनेता नितीश भालुनी म्हणाला...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2023 08:39 AM IST

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tappu replace: आता अभिनेता नितीश भालुनी नव्या ‘टप्पू’च्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, आता चाहते त्याची तुलना जुन्या टप्पूशी म्हणजेच राजसोबत करत आहेत.

Tappu
Tappu

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tappu replace: तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो गेली १५ वर्ष प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत या शोमध्ये अनेक कलाकार बदलले आहेत. काही महिन्यांपूर्वी टप्पूची भूमिका साकारणाऱ्या राज अनादकतनेही या शोला अलविदा केला होता. त्यानंतर आता अभिनेता नितीश भालुनी नव्या ‘टप्पू’च्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, आता चाहते त्याची तुलना जुन्या टप्पूशी म्हणजेच राजसोबत करत आहेत. यावर आता स्वतः नितीशने प्रतिक्रिया दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

नुकत्याच एक वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत नितीश म्हणाला की, टप्पू ही व्यक्तिरेखा आता तो त्याच्या खास शैलीत साकारणार आहे आणि त्याला खात्री आहे की चाहत्यांना ही भूमिका खूप आवडेल. नितीश म्हणाला, 'मी या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे. मला माहित आहे की, खूप मेहनत करावी लागणार. कारण प्रेक्षकांच्या माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. शोचे प्रेक्षक माझ्यावर अधिक प्रेम करतील यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करत आहे. प्रेक्षकांना माझे काम नक्की आवडेल.’

राजसोबत तुलना होण्याविषयी बोलताना नितीश म्हणाला, 'मला वाटतं की, राजने हे पात्र त्याच्या पद्धतीने साकारले आहे. त्यात त्याची स्वतःची शैली होती. प्रत्येक अभिनेत्याची स्वतःची विचारप्रक्रिया असते आणि त्यानुसार ते व्यक्तिरेखेशी एकरूप होतात. आता टप्पूचे पात्र मी माझ्या पद्धतीने साकरणार आहे.’

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत नितीश भालुनी, राज अनादकतला रिप्लेस करणार आहे. अभिनेता नितीश भालुनी आता ‘टप्पू’ साकारताना दिसणार आहे. राज अनादकतची शोमधून अचानक एक्झिट झाल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, आता नव्या ‘टप्पू’सह निर्माते शो पुढे नेण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. आता नितीश भालुनीने शोच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. जेठालालचा मुलगा बनून नितीश प्रेक्षकांची मने जिंकू शकेल की, नाही हे आता प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून कळणार आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आधी नितीश 'मेरी डोली मेरे अंगना' या मालिकेमध्ये झळकला होता.

IPL_Entry_Point