मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Taraka Ratna: ज्युनियर एनटीआरच्या भावाचं निधन, ३९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Taraka Ratna: ज्युनियर एनटीआरच्या भावाचं निधन, ३९व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2023 07:24 AM IST

Nandamuri Taraka Ratna Passes Away: साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर याचा भाऊ आणि तेलुगु देसम पक्षाचे नेते नंदामुरी तारक रत्न यांचे निधन झाले आहे.

Nandamuri Taraka Ratna
Nandamuri Taraka Ratna

Nandamuri Taraka Ratna Passes Away: साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआर याचा भाऊ आणि तेलुगु देसम पक्षाचे नेते नंदामुरी तारक रत्न यांचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या ३९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. राजकारणी असण्यासोबतच तारक रत्न अभिनेते देखील होते. त्यांच्या निधनामुळे साऊथ मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. अल्लू अर्जुन, चिरंजीवी यांच्याआहा अनेक कलाकार आणि चाहते तारक रत्न यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

एका प्रचार सभेत सामील झालेल्या तारक रत्न यांना सभेदरम्यान हार्टअटॅक आला होता. तारक रत्न यांना एका रॅलीत असताना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला ते अचानक बेशुद्ध झाल्याचे बोलले जात होते, मात्र नंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे समोर आले, त्यानंतर ते कोमात गेले.

अभिनेते तारक रत्न त्यांचे चुलत भाऊ नारा लोकेश यांच्या पदयात्रेत सामील होण्यासाठी आला होता. यादरम्यान ते अचानक बेशुद्ध पडले आणि तत्काळ अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. तब्बल २३ दिवस त्यांच्या हा संघर्ष सुरू होता. २७ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली होती. अखेर शनिवारी (१८ फेब्रुवारी) रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिनेते तारक रत्न हे दिग्गज अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नंदामुरी तारक रामाराव यांचे नातू आहेत. तारक रत्न यांनी २००३मध्ये आलेल्या 'ओकाटो नंबर कुर्राडू' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या. याशिवाय त्यांनी ओटीटीवरही धमाकेदार पदार्पण केले होते.

IPL_Entry_Point

विभाग