मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Swara Bhasker : लग्नापूर्वीच स्वरा भास्कर झाली प्रेग्नंट?, व्हायरल व्हिडिओवरून चर्चांना उधाण

Swara Bhasker : लग्नापूर्वीच स्वरा भास्कर झाली प्रेग्नंट?, व्हायरल व्हिडिओवरून चर्चांना उधाण

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Feb 18, 2023 09:59 PM IST

Swara Bhasker Marriage : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने नुकतंच कोर्ट मॅरेज केलं आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतानाच आता ती प्रेग्नेंट असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.

Swara Bhasker Marriage
Swara Bhasker Marriage (HT)

Swara Bhasker Marriage : बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने समाजवादी पार्टीचा नेता फहाद अहमदशी नुकतंच कोर्ट मॅरेज केलं आहे. त्याचे फोटोही दोघांनी सोशल मीडियावर शेयर केले आहेत. स्वरानं अचानक लग्न केल्यामुळं तिच्या अनेक चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. स्वरा आणि फहादने १६ फेब्रुवारीला मुंबईत स्पेशल मॅरेज कायद्यानुसार लग्नसोहळा उरकला आहे. पुढील महिन्यात ते नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधणार आहेत. परंतु आता कोर्ट मॅरेज केल्यानंतर स्वराचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे, त्यानंतर स्वरा लग्नापूर्वीच प्रेग्नेंट असल्याचा दावा करण्यात येत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्वरा आणि फहाद यांनी कोर्ट मॅरेज केल्यानंतर ते बाहेर पडत असताना व्हिडीओ जर्नलिस्ट योगेन शाह यांनी व्हिडिओ शूट केला आहे. त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेयरही केला आहे. परंतु या व्हायरल व्हिडिओमध्ये स्वरा भास्कर बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचं अनेक युजर्सनी म्हटलं आहे. त्यामुळं आता स्वरा भास्कर लग्नापूर्वीच प्रेग्नेंट झाल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं आहे.

स्वरा भास्करचा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरनं कमेंट्समध्ये 'प्रेग्नेंट आहेस का?', असा प्रश्न केला आहे. याशिवाय अनेक युजर्सदेखील या व्हिडिओवरून स्वरा भास्कर गर्भवती असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. परंतु या प्रकरणावर स्वरा भास्करनं अद्याप कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. स्वरा भास्कर बॉलिवूडमधील चित्रपटांतील भूमिकांमुळं नेहमीच प्रकाशझोतात राहिलेली आहे. याशिवाय स्वरा नेहमीच सोशल मीडियावर राजकीय वक्तव्य करत थेट भूमिका घेत असल्यामुळं तिला अनेकदा ट्रोलदेखील केलं गेलेलं आहे. दिल्लीतील शाहिनबागमधील आंदोलनावेळी स्वरा आणि फहादची भेट झाली होती. त्यानंतर अनेक महिने रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी कोर्ट मॅरेज केलं आहे.

IPL_Entry_Point