TMKOC: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये नव्या ‘टप्पू’ची एन्ट्री; ‘हा’ अभिनेता साकारणार भूमिका!
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tappu replace: राज अनादकत याने मालिका सोडल्याने काही दिवसांपासून ‘टप्पू’ हे पात्र देखील मालिकेत दिसत नव्हते. मात्र, आता लवकरच ‘टप्पू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Tappu replace: टेलिव्हिजन जगतातील सर्वात लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असतो. गेली १५ वर्षे हा शो प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. १५ वर्षांच्या या प्रवासात आतापर्यंत अनेक कलाकारांनी या शोला अलविदा केला आहे. पण, प्रेक्षकांचे प्रेम मात्र तसूभरही कमी झालेले नाही. मात्र, गेल्या काही महिन्यांत या मालिकेत नव्या कलाकारांनी देखील एन्ट्री घेतली आहे. राज अनादकत याने मालिका सोडल्याने काही दिवसांपासून ‘टप्पू’ हे पात्र देखील मालिकेत दिसत नव्हते. मात्र, आता लवकरच ‘टप्पू’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत आता एक नवा चेहरा राज अनादकतला रिप्लेस करणार आहे. अभिनेता नितीश भालुनी आता ‘टप्पू’ साकारताना दिसणार आहे. राज अनादकतची शोमधून अचानक एक्झिट झाल्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. मात्र, आता नव्या ‘टप्पू’सह निर्माते शो पुढे नेण्यासाठी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. मात्र, अद्याप निर्मात्यांनी या विषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.
‘टप्पू’ साकारणाऱ्या राज अनादकत याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपण ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सोडत असल्याचं जाहीर केलं होतँ. त्याने या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, ‘सगळ्यांना नमस्कार, आता ती वेळ आली आहे, जेव्हा सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला पाहिजे. मी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेपासून आता वेगळा होत आहे. हा प्रवास खूप सुंदर होता, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. हा माझ्या करिअरमधला सगळ्यात चांगला काळ होता. या काळात अनेक मित्र जोडले गेले, आम्ही खूप धमाल केली. मला सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानायचे आहेत, ज्यांनी या प्रवासात मला साथ दिली.’
आता नितीश भालुनी लवकरच शोच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. जेठालालचा मुलगा बनून नितीश प्रेक्षकांची मने जिंकू शकेल की, नाही हे आता प्रेक्षकांच्या प्रतिसादावरून कळणार आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आधी नितीश 'मेरी डोली मेरे अंगना' या मालिकेमध्ये झळकला होता.