मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: ‘पठाण’नंतर शाहरुख खान ‘डंकी’साठी सज्ज; सेटवरील व्हिडीओ होतोय Viral!

Shah Rukh Khan: ‘पठाण’नंतर शाहरुख खान ‘डंकी’साठी सज्ज; सेटवरील व्हिडीओ होतोय Viral!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 19, 2023 08:06 AM IST

Shah Rukh Khan in Dunki: ‘पठाण’ रिलीज झाल्यानंतर लगेचच शाहरुख खानने त्याच्या आगामी चित्रपटांचे काम हाती घेतले आहे.

Shah Rukh Khan
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan in Dunki: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 'पठाण' हा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. ‘पठाण’ने कमाईच्या बाबतीत ‘बाहुबली २’ला देखील मागे टाकले आहे. ‘पठाण’ या चित्रपटातून शाहरुख खान याने तब्बल ४ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. मात्र, तरीही त्याच्या जादू तसूभरही कमी झालेली नाही. ‘पठाण’नंतर आता शाहरुख खानचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्ट्ससाठी देखील खूप उत्सुक आहेत. दरम्यान, आता ‘डंकी’ चित्रपटाच्या सेटवरून त्याचे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

शाहरुख खानचा कूल अंदाज चाहत्यांना नेहमीच आवडतो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओंमध्ये देखील शाहरुख खानचा हाच अंदाज पाहायला मिळाला आहे. ‘पठाण’ रिलीज झाल्यानंतर लगेचच शाहरुख खानने त्याच्या आगामी चित्रपटांचे काम हाती घेतले आहे. शाहरुख ‘जवान’ आणि ‘डंकी’साठी भरपूर मेहनत घेत आहे. नुकताच ‘डंकी’ या चित्रपटाच्या पुण्यातील सेटवरून एक व्हिडीओ व्हायरल होत असून, चाहते यावर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.

शाहरुख खानने राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’च्या दुसऱ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू केले आहे. गेल्या आठवड्यात शाहरुख मुंबईत जवानचे शूटिंग करत होता आणि आता शेवटच्या शेड्युलसाठी तो पुण्यात पोहोचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुखने या चित्रपटातील गाणे एका कॉलेजमध्ये शूट केले आहे. त्यानंतर त्याचे शूटिंग सेटवरील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

शाहरुख खान पहिल्यांदाच दिग्दर्शक राजकुमार हिराणींसोबत काम करणार आहे. 'डंकी' या चित्रपटाची कथा बेकायदेशीरपणे सीमा ओलांडून स्थलांतरण करणाऱ्या व्यक्तींवर आधारित आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत बोमन इराणी, तापसी पन्नू आणि विकी कौशल महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. शाहरुख खानचा हा बहुचर्चित चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

IPL_Entry_Point