मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला, ‘...तर मी पुन्हा येईन’

Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला, ‘...तर मी पुन्हा येईन’

Feb 20, 2023, 02:39 PM IST

    • Ask SRK session by Shah Rukh Khan: एका चाहत्याने शाहरुख खानला त्याच्या निवृत्तीविषयी प्रश्न विचारला, ज्याचे किंग खानने हटके उत्तर दिले आहे.
Shah Rukh Khan

Ask SRK session by Shah Rukh Khan: एका चाहत्याने शाहरुख खानला त्याच्या निवृत्तीविषयी प्रश्न विचारला, ज्याचे किंग खानने हटके उत्तर दिले आहे.

    • Ask SRK session by Shah Rukh Khan: एका चाहत्याने शाहरुख खानला त्याच्या निवृत्तीविषयी प्रश्न विचारला, ज्याचे किंग खानने हटके उत्तर दिले आहे.

Ask SRK session: बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खान नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असतो. आता देखील त्याने स्वतःच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर आस्क एसआरके सेशन आयोजित केले आहेत. यात शाहरुख खान स्वतः चाहत्यांना उत्तरं देत आहे. चाहते देखील शाहरुखला भन्नाट प्रश्न विचारात आहेत. या दरम्यान, शाहरुख देखील चाहत्यांच्या या प्रश्नांना उत्तरं देत आहे. एका चाहत्याने शाहरुख खानला त्याच्या निवृत्तीविषयी प्रश्न विचारला, ज्याचे किंग खानने हटके उत्तर दिले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

मराठी मनोरंजन विश्वाची ‘मँगो डॉली’! अभिनेत्री उर्मिला कोठारे हिचे गाजलेले ‘हे’ चित्रपट पाहिलेत का?

यावेळी एका चाहत्याने शाहरुख खानला पप्रश्न विचारला की, ‘तू निवृत्त झाल्यावर कोण सुपरस्टार असेल असे तुला वाटते?’ यावर उत्तर देताना शाहरुख खान म्हणाला की, ‘मी अभिनयातून कधीच निवृत्त होणार नाही...मला काढून टाकावे लागेल...आणि तेव्हाही मी पुन्हा आधीपेक्षा हॉट होऊन होईन!!’ शाहरुखचं हे उत्तर वाचून त्याचे चाहते चांगलेच खुश झाले आहेत. त्यांनी शाहरुख खानला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘Ask SRK’ या ट्विटर सेशनमध्ये चाहते आणि सोशल मीडिया युझर अभिनेता शाहरुख खान याला टॅग करून आपल्या मनातील कोणताही प्रश्न विचारू शकतात. यातील प्रश्नांना शाहरुख खान स्वतः उत्तरं देतो. आजच्या या सेशनमध्ये देखील चाहत्यांनी शाहरुखवर अनेक भन्नाट प्रश्नांची सरबत्ती केली. विशेष म्हणजे शाहरुखनेही वेळात वेळ काढून चाहत्यांच्या या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी देखील शाहरुख खान चाहत्यांच्या हटके प्रश्नांना त्याच्या खास स्टाईलने उत्तरं दिले आहे.

शाहरुख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींचा गल्ला जमवला आहे. केवळ देशातच नव्हे, तर परदेशांतही या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या सगळ्यांत आता शाहरुख खानने पुन्हा एकदा चाहत्यांशी थेट संवाद साधला आहे. शाहरुख खान सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. इतकंच नाही तर, चाहत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना देखील तो उत्तरं देतो.