मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या अडचणी वाढणार? पत्नीनंतर आता मोलकरणीनेही केले गंभीर आरोप!

Nawazuddin Siddiqui: नवाजुद्दीनच्या अडचणी वाढणार? पत्नीनंतर आता मोलकरणीनेही केले गंभीर आरोप!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 20, 2023 01:23 PM IST

Nawazuddin Siddiqui Controversy: आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरात काम करण्याऱ्या महिलेने देखील अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Nawazuddin Siddiqui
Nawazuddin Siddiqui

Nawazuddin Siddiqui Controversy: आपल्या अभिनयाने मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे मात्र आता मोठ्या अडचणीत सापडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीच्या खाजगी आयुष्यात सतत काहीना काही गोष्टी घडत आहेत. एकीकडे त्याच्या पत्नीने त्यावर काही आरोप केले होते. तर, आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरात काम करण्याऱ्या महिलेने देखील अभिनेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या घरी काम करणाऱ्या या महिलेने स्वतःचा एक व्हिडीओ शेअर करत आपली आपबिती सांगितली आहे. या व्हिडीओमधून तिने नवाजुद्दीन सिद्दीकीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या दुबई स्थित घरात काम करणाऱ्या सपना नावाच्या मोलकरणीचा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया हिचा वकील रिझवान याने हा व्हिडीओ शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी एक लांबलचक स्टेटमेंटही जारी केले आहे, ज्यामध्ये नवाजने सपनाची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केल्याचे सांगण्यात आले आहे. आलियाच्या वकिलाचा दावा आहे की, नवाजुद्दीन सिद्दीकीने दुबईच्या रेकॉर्डमध्ये सपनाचा एका अज्ञात कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून उल्लेख केला होता. तर, प्रत्यक्षात अभिनेत्याने आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी सपनाला कामावर ठेवले होते. आलिया सिद्दीकी काही काळापूर्वी मुलांसह भारतात परतली. मात्र, मोलकरीण सपना तिथेच राहिली.

सपनाने व्हिडीओ रेकॉर्ड करताना ती नवाजुद्दीनच्या दुबईतील घरात अडकल्याची माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये सपना रडताना दिसत असून, तिने तिचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे. सपना व्हिडीओमध्ये रडत असून, तेथून सोडवा, असे आवाहन करत आहे. सपना म्हणते की, 'मी नवाजुद्दीन सरांच्या घरी काम करते. मॅडम गेल्यानंतर सरांनी मला व्हिसा दिला होता, ज्याचे पैसे ते माझ्या पगारातून कापत आहेत. त्यामुळे मला खूप त्रास होत आहे. मला दोन महिन्यांपासून माझा पगार मिळालेला नाही, माझ्याकडे एक पैसाही नाही. मला घरी जायचे आहे. मला मदत करा.’

सपनाचा हा व्हिडिओ नवाजुद्दीनची पत्नी आलियाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. दुबईत अडकलेल्या सपनाची सुटका करण्याची मागणी रिझवानने भारत सरकारकडे केली आहे.

 

IPL_Entry_Point

विभाग