मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nawazuddin Siddiqui: सासू-सुनेच्या भांडणात नवाजुद्दीन सिद्दीकीने सोडले घर, राहतोय हॉटेलवर

Nawazuddin Siddiqui: सासू-सुनेच्या भांडणात नवाजुद्दीन सिद्दीकीने सोडले घर, राहतोय हॉटेलवर

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 06, 2023 11:17 AM IST

Nawazuddin Siddiqui: गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया आणि आई यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद सुरु असल्याचे म्हटले जात आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकी
नवाजुद्दीन सिद्दीकी

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी नवाजुद्दीनची आई मेहरुन्निसा सिद्दीकी यांनी सून आलिया विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आलियाच्या वकीलांनी मेहरुन्निसा यांच्यावर अनेक आरोप केले. या दरम्यान, नवाजुद्दीनने घर सोडल्याची माहिती समोर आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, नवाजुद्दीन सध्या हॉटेलवर राहात आहे. नवाजच्या जवळच्या मित्राने याबाबत माहिती दिली आहे. नवाज पुढचे किती दिवस हॉटेलवर राहणार आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण त्याने पत्नी आणि आईच्या भांडणाला कंटाळून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: शुभमन गिल आणि सारा एअरपोर्टवर घालवतायेत एकत्र वेळ? PHOTO Viral

गेल्या काही दिवसांपासून सासू आणि सून या दोघींमध्ये प्रॉपर्टीवरुन वाद सुरु आहे. त्यामुळे नवाजुद्दीनच्या आईने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये नवाजच्या आईने आलियावर अनेक आरोप केले. त्यानंतर आलियाच्या वकिलांनी घराबाहेरचा व्हिडीओ शेअर करत मेहरुन्निसा यांना उत्तर दिले. आलियाचे वकील रिजवान सिद्दीकी यांच्या म्हणण्यानुसार, २२ जानेवारी रोजी आलिया सिद्दीकी नवाजला भेटण्यासाठी वर्सोवा येथील घरी गेली होती. त्यांना काही कौटुंबिक समस्यांवर बोलायचे होते. मीडियामध्ये त्यांच्या संपत्तीसंबंधी वाद सुरु आहेत अशा चर्चा सुरु आहेत खरं तर त्या फेक आहेत. आता नेमकं काय सत्य आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

नवाजुद्दीन आणि जैनब उर्फ आलिया यांचा २०१० साली विवाह झाला. २०११मध्ये त्यांना एक मुलगी झाली. त्यानंतर काही दिवसांमध्ये नावज आणि आलियाने घटस्फोट घेतला. २०१४मध्ये पुन्हा ते दोघे लिव्ह इनमध्ये राहू लागले. पुन्हा पाच-सहा महिने एकत्र राहिल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरु झाले. याच दरम्यान आलिया पुन्हा प्रेग्नंट होती. आता पुन्हा त्यांच्यामध्ये वाद सुरु झाल्याचे समोर आले आहे.

IPL_Entry_Point

विभाग