Priyanka Chopra, Nick Jonas: बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार बनली आहे. अमेरिकन पॉप स्टार-गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधून प्रियांका आता अमेरिकेची सून झाली आहे. प्रियांका आणि निक जोनास या दोघांच्या वयात फार अंतर असल्याने सुरुवातीला त्यांच्यावर टीका देखील झाली होती. मात्र, त्यांनी आपल्या नात्यावर या कशाचाही परिणाम होऊ दिला नाही. सोशल मीडियावर दोघेही आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. मात्र, आता एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्रियांका आणि निकचे एकमेकांवरील प्रेम दिसून आले आहे.
नुकताच निक जोनासचा लाईव्ह म्युझिक शो जल्लोषात पार पडला. जोनास ब्रदर्सच्या या लाईव्ह शोला प्रियांका चोप्राने देखील हजेरी लावली होती. या दरम्यान निक गाणं गाऊ लागताच प्रियांका जागेवरून उठली आणि चक्क भर कॉन्सर्टमध्येच तिने ठेका धरला. पतीच्या करिअरला असा खंबीर पाठिंबा देणाऱ्या प्रियांका चोप्राचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, चाहते दोघांचं प्रचंड कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर देखील या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास ही जोडी नेहमीच चर्चेत असते. प्रियांकाने बॉलिवूडनंतर आपल्या अभिनयाच्या बळावर हॉलिवूडदेखील गाजवलं आहे. अमेरिकन गायक निक जोनास याच्याशी लग्नगाठ बांधल्यानंतर प्रियांका सर्वाधिक चर्चेत आली होती. एका अतिशय भव्यदिव्य अशा सोहळ्यात प्रियांका आणि निक जोनास यांच्या विवाह पार पडला होता. १ डिसेंबर २०१८ रोजी या जोडीने लग्नगाठ बांधली होती.
दोघांचे लग्न दोन वेगवेगळ्या पद्धतींमध्ये पार पडले होते. उदयपूरच्या उम्मेद भवनमध्ये या दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन परंपरांनुसार लग्नगाठ बांधली होती. तर, जानेवारी २०२२मध्ये त्यांनी लेक ‘मालती मेरी’चं आपल्या कुटुंबात स्वागत केलं आहे. नुकताच त्यांनी आपल्या लेकीचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.
संबंधित बातम्या