मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  BAFTA Awards 2023: ‘बाफ्टा’मध्ये ‘आरआरआर’चा उल्लेखही नाही! जगभरातील नाराज चाहते म्हणतायत..

BAFTA Awards 2023: ‘बाफ्टा’मध्ये ‘आरआरआर’चा उल्लेखही नाही! जगभरातील नाराज चाहते म्हणतायत..

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 20, 2023 01:49 PM IST

BAFTA Awards 2023: बाफ्टा अवॉर्ड्समध्ये ‘आरआरआर’ या चित्रपटाचा उल्लेख नाही आणि हे पाहून जगभरातील चाहते सध्या संतप्त झाले आहेत.

RRR
RRR

BAFTA Awards 2023: ब्रिटीश मनोरंजन विश्वात अतिशय प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘बाफ्टा पुरस्कार २०२३’ आज (२० फेब्रुवारी) पार पडला. मात्र, यंदा या सोहळ्यात एकाही भारतीय चित्रपटाला स्थान मिळालेले नाही. गोल्डन ग्लोब अवॉर्ड जिंकल्यानंतर 'आरआरआर' चित्रपटाने ऑस्करच्या नामांकन यादीतही स्थान मिळवले आहे. मात्र, बाफ्टा अवॉर्ड्समध्ये ‘आरआरआर’ या चित्रपटाचा उल्लेख नाही आणि हे पाहून जगभरातील चाहते सध्या संतप्त झाले आहेत.

यावेळी जर्मन चित्रपट 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' ने बाफ्टा अवॉर्ड्स २०२३मध्ये बरेच पुरस्कार जिंकले. या पुरस्कार सोहळ्यात जर्मन चित्रपटाला एक-दोन नव्हे, तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट चित्रपट आणि इंग्रजी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट असे एकूण ७ पुरस्कार मिळाले. 'ऑल क्वाएट ऑन द वेस्टर्न फ्रंट' हा चित्रपट एरिक मारिया रीमार्क यांनी महायुद्धाच्या शोकांतिकेवर लिहिलेल्या कादंबरीवर आधारित आहे.

तर, ऑस्करमध्ये नामांकन मिळाल्यामुळे, एसएस राजामौली यांचा ‘आरआरआर’ हा चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. अशावेळी बाफ्टा अवॉर्ड्समध्ये नामांकनही न मिळाल्याने चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. तर, नेटकरी बाफ्टा पुरस्कार सोहळ्यावर टीका देखील करत आहेत. अनेकांनी याचा संबंध थेट ‘आरआरआर’च्या कथानकाशी लावला आहे. या चित्रपटात ब्रिटीशांविरोधात बंड दाखवल्याने चित्रपट वगळण्यात आल्याचा आरोप चाहत्यांनी केला आहे.

‘आरआरआर’ या चित्रपटाने भारतात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा चित्रपट परदेशातही आपली जादू दाखवत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाने बाजी मारली आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट्टसह श्रिया सरन, अजय देवगण यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनेक मानाचे पुरस्कार पटकावणाऱ्या या चित्रपटाला ‘बाफ्टा’मध्ये मात्र स्थान मिळालेले नाही.

IPL_Entry_Point

विभाग