मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Priyanka Chahar Choudhary: सलमान खान म्हणाला ‘प्रियांकाच खरी विजेती’; नव्या चित्रपटात मिळणार संधी?

Priyanka Chahar Choudhary: सलमान खान म्हणाला ‘प्रियांकाच खरी विजेती’; नव्या चित्रपटात मिळणार संधी?

Feb 13, 2023, 12:16 PM IST

    • Bigg Boss 16 Contestant Priyanka Chahar Choudhary: ‘बिग बॉस १६’च्या विजेतेपदी अभिनेत्री प्रियांका चौधरी चहरचे नाव प्रचंड चर्चेत होते. मात्र, तिची ही संधी थोडक्यात हुकली.
Priyanka Chahar Choudhary

Bigg Boss 16 Contestant Priyanka Chahar Choudhary: ‘बिग बॉस १६’च्या विजेतेपदी अभिनेत्री प्रियांका चौधरी चहरचे नाव प्रचंड चर्चेत होते. मात्र, तिची ही संधी थोडक्यात हुकली.

    • Bigg Boss 16 Contestant Priyanka Chahar Choudhary: ‘बिग बॉस १६’च्या विजेतेपदी अभिनेत्री प्रियांका चौधरी चहरचे नाव प्रचंड चर्चेत होते. मात्र, तिची ही संधी थोडक्यात हुकली.

Bigg Boss 16 Contestant Priyanka Chahar Choudhary: लोकप्रिय टीव्ही शो ‘बिग बॉस १६’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. या शोमध्ये रॅपर एमसी स्टॅन याने विजेतेपद पटकावले आहे. मात्र, शोच्या महाअंतिम सोहळ्यापर्यंत विजेत्यांच्या नावात कुठेही एमसी स्टॅनचे नाव समोर आले नव्हते. मात्र, ऐनवेळी विजेतेपदाची माळ त्याच्या घरात पडली. दरम्यान विजेतेपदासाठी प्रियांका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांचे नाव चर्चेत होते. या शोचे विजेते पद जरी हुकले असले, तरी त्यांना आता मोठी लॉटरी लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान याला अटक

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूचे खरे नाव माहिती आहे का? तिच्या वाढदिवशी चला जाणून घेऊया..

स्वाती आणि इंद्राने मागितली मुक्ता हिची माफी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय घडणार जाणून घ्या

‘बिग बॉस १६’च्या विजेतेपदी अभिनेत्री प्रियांका चौधरी चहरचे नाव प्रचंड चर्चेत होते. मात्र, तिची ही संधी थोडक्यात हुकली. या शोचे विजेतेपद जरी प्रियांकाला मिळाले नसले, तरी तिला मोठमोठ्या संधी मिळणार आहेत. प्रियांका चहर चौधरी हा टीव्ही शो जिंकू शकली नसली, तरी तिला मोठी लॉटरी लागली आहे. ‘बिग बॉस १६’च्या घरात ‘माय ग्लॅम’ने एक सौंदर्य स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये ‘बिग बॉस’च्या सर्व महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ज्या स्पर्धकाला प्रेक्षकांची सर्वाधिक मते मिळतील, तिला माय ग्लॅमच्या जाहिरातीत श्रद्धा कपूरसोबत काम करण्याची संधी मिळेल, असे ठरले होते. केवळ जाहिरातच नाही तर, सोबत २५ लाख रुपयेही दिले जाणार होते.

‘बिग बॉस १६’च्या घरातील ही स्पर्धा प्रियंका चहर चौधरी जिंकली. यामुळे तिच्या हातात आत श्रद्धा कपूरसोबत झळकण्याची संधी आणि २५ लाख रुपयांचे बक्षीस आहे. याशिवाय तिला आता आणखी एक सरप्राईज मिळाले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रियांकाला बॉलिवूडमध्ये संधी मिळाली असून, ती शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटामध्ये झळकणार असल्याचे म्हटले जात आहे.

इतकेच नाही तर, ‘दबंग’ अभिनेता सलमान खान यानेही प्रियांका चहर चौधरीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सलमान खानने प्रियांका चहर चौधरी या शोची खरी विजेती असल्याचे देखील म्हटले आहे. तर, आता प्रियांका चहर चौधरीला सलमान खानच्या आगामी चित्रपटात संधी मिळणार असल्याचे म्हटले जात आहे. प्रियांकानी आतापर्यंत काही ओटीटी शो आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. मात्र, बिग बॉस १६ संपल्यानंतर आता तिच्यासाठी बॉलिवूडची कवाडं खुली होणार आहेत.