मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Bigg Boss 16: शिवला मागे टाकत प्रियांका चाहर चौधरी जिंकणार बिग बॉस १६चा ताज?

Bigg Boss 16: शिवला मागे टाकत प्रियांका चाहर चौधरी जिंकणार बिग बॉस १६चा ताज?

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 12, 2023 01:26 PM IST

Priyanka Chahar Choudhar: ग्रँड फिनालेआधी ऑरमॅक्सने दिलेल्या रेटिंगमध्ये मोठा खुलासा झाला आहे. यामध्ये प्रियांका चाहर चौधरी बिग बॉस १६ जिंकणार असल्याचे म्हटले जात आहे.

बिग बॉस १६
बिग बॉस १६ (HT)

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिली जातो. सध्या हिंदी बिग बॉसचे १६वे पर्व चर्चेत आहे. या चर्चा शोमध्ये मराठी बिग बॉसचा विजेता शिव ठाकरे त्यामध्ये सहभागी झाल्यामुळे रंगल्या आहेत. आज या शोचा विजेता घोषीत होणार आहे. त्यापूर्वी बिग बॉस १६चा ताज प्रियांका चाहर चौधरी जिंकणार असल्याचे म्हटले जात आहे.

नुकताच ऑरमॅक्सची रेटिंग समोर आली आहे. यामध्ये मोठा खुलासा झाला आहे. ही रेटिंग ४ फेब्रुवारी ते १० फेब्रुवारी दरम्यानची आहे. १९व्या आठवड्यात मोठा बदल झाला आहे. या रेटिंग नुसार प्रियांका चाहर चौधरी बिग बॉस १६ जिंकणार आहे.

१. प्रियांका चाहर चौधरी

२. एमसी स्टॅन

३. शिव ठाकरे

४. अर्चना गौतम

५. शालीन भनोट

फिनाले आधीच शोचा विजेता ठरणं अशक्य असते. मात्र ऑरमॅक्सच्या रेटिंग नुसार आता बिग बॉसचा विजेता होणार की दुसरं कोणी हा ताज पटकावणार हे पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत. निम्रत कौर अहलुवालिया घराबाहेर पडल्यानंतर आता ‘बिग बॉस १६’मध्ये शिव ठाकरे, अर्चना गौतम, प्रियांका चौधरी, एमसी स्टॅन आणि शालीन भानोत हे स्पर्धक टिकून रहिले आहेत. ‘बिग बॉस १६’चा ग्रँड फिनाले येत्या १२ फेब्रुवारीला पार पडणार आहे. त्यामुळे यंदाच्या सिझनचा कोण विजेता होणार हे लवकरच सर्वांसमोर येणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग