मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Adipurush : ‘आदिपुरुष’च्या नव्या गाण्याने रचला विक्रम; २४ तासांत मिळवले सर्वाधिक व्ह्यूज!

Adipurush : ‘आदिपुरुष’च्या नव्या गाण्याने रचला विक्रम; २४ तासांत मिळवले सर्वाधिक व्ह्यूज!

May 21, 2023, 09:41 AM IST

  • Adipurush Jai Shri Ram: ‘जय श्री राम’ गाण्याचा व्हिडीओ गेल्या २४ तासांत यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ ठरला आहे.

Adipurush

Adipurush Jai Shri Ram: ‘जय श्री राम’ गाण्याचा व्हिडीओ गेल्या २४ तासांत यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ ठरला आहे.

  • Adipurush Jai Shri Ram: ‘जय श्री राम’ गाण्याचा व्हिडीओ गेल्या २४ तासांत यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ ठरला आहे.

Adipurush Jai Shri Ram: साऊथ स्टार प्रभास आणि क्रिती सेनन स्टारर 'आदिपुरुष' पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शनिवारी चित्रपटाच्या निर्मात्यांनी संगीतकार अजय आणि अतुल गोगावले यांच्यासह चित्रपटाचे पहिले गाणे ‘जय श्री राम’ रिलीज केले. ‘जय श्री राम’ हे गाणे अजय आणि अतुल यांनी त्यांच्या संपूर्ण टीमसह लाईव्ह ऑर्केस्ट्रासह रिलीज केले. अजय आणि अतुल यांनी गाण्याच्या लाँचिंगवेळी सांगितले की, हे गाणे बनवताना त्यांच्यासोबत काही जादूई शक्ती होती. आता या गाण्याने नवा विक्रम रचला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अंतराची अंगठी घेण्यासाठी अभिराम लीला शोधून काढणार? ‘नवरी मिळे हिटलर’ला मालिकेत येणार नवा ट्वीस्ट

प्रियाचा चोंबडेपणा सायलीला पडणार भारी! द्यावी लागणार प्रेमाची परीक्षा; ‘ठरलं तर मग’मध्ये येणार वळण!

परदेशवारी करणाऱ्या मुक्ता बर्वेला येतेय मायदेशाची आठवण! पोस्ट लिहित म्हणाली, ‘मी आत्ता भारतात नाहीये…’

सायली-अर्जुनने मारली बाजी, तर तेजश्री प्रधानची मालिका पुन्हा पडली मागे! पाहा १६व्या आठवड्याचा TRP Report

‘जय श्री राम’ गाण्याचा व्हिडीओ गेल्या २४ तासांत यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेला व्हिडीओ ठरला आहे. प्रसिद्ध झालेल्या अहवालाच्या आकडेवारीनुसार, ‘आदिपुरुष’ला २६,२९१,२३७ व्ह्यूज आणि ४,८४,१८६ लाईक्स मिळाले आहेत. या गाण्याने अक्षय कुमारच्या 'क्या लोग तुम' गाण्याला मागे टाकत गेल्या २४ तासांत सर्वाधिक व्ह्यूज मिळवले आहेत. गाण्याच्या लाँचिंगच्या वेळी या गाण्याच्या प्रवासाविषयी बोलताना गायक-संगीतकार अजय म्हणाले की, ‘या गाण्याचे नाव हीच आमची प्रेरणा आहे.’

Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये होणार ‘श्रीवल्ली’चा मृत्यू? काय आहे व्हायरल फोटो मागचं सत्य? जाणून घ्या...

अजय गोगावलेच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटासाठी त्याने संगीतबद्ध केलेले हे पहिले गाणे होते. जेव्हा त्याला चित्रपटाची ऑफर आली होती, तेव्हाच त्याला या गाण्याबद्दल सांगण्यात आले होते. श्रीरामाचे नाव ऐकताच ती शक्ती आणि भक्ती आपोआपच त्यांच्यात आली. गाणे बनवताना ही जादूई शक्ती त्याच्यासोबत होती. त्यांची गाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होण्याची ही पहिलीच वेळ होती आणि त्यावर थेट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. गाण्याला मिळत असलेल्या प्रेमामुळे आम्ही अवाक झालो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट संस्कृत महाकाव्य रामायणावर आधारित आहे. या चित्रपटात ‘राघव’च्या भूमिकेत प्रभास, ‘जानकी’च्या भूमिकेत क्रिती सेनन आणि ‘लक्ष्मण’च्या भूमिकेत सनी सिंह दिसणार आहेत. या चित्रपटाबाबत सुरुवातीपासूनच अनेक वाद सुरू आहेत. मात्र, जेव्हा ‘आदिपुरुष’चा ट्रेलर रिलीज झाला, तेव्हा लोकांना तो खूप आवडला. चित्रपटाच्या दिग्दर्शकानेही पात्रांच्या लूकमध्ये आवश्यक ते बदल करून हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

विभाग