मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Govinda Dance : रश्मिकासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर गोविंदाचा भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ

Govinda Dance : रश्मिकासोबत ‘सामी सामी’ गाण्यावर गोविंदाचा भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ

Sep 25, 2022, 11:02 AM IST

    • Govinda Dance On Sami Sami Song : पुष्पा चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या गाण्यावर गोविंदानं रश्मिकासह ठेका धरला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Rashmika Mandanna And Govinda Dance On Sami Sami Song (HT)

Govinda Dance On Sami Sami Song : पुष्पा चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या गाण्यावर गोविंदानं रश्मिकासह ठेका धरला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

    • Govinda Dance On Sami Sami Song : पुष्पा चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या गाण्यावर गोविंदानं रश्मिकासह ठेका धरला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Rashmika Mandanna And Govinda Dance On Sami Sami Song : १९९० च्या दशकात आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता गोविंदा त्याच्या डान्सनं नेहमीच चाहत्यांना भुरळ घालत असतो. परंतु काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदनाची गोविंदाशी DID Super Moms च्या सेटवर भेट झाली. त्यानंतर दोघांनाही एकमेकांसोबत डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. दोघांनीही सामी-सामी या गाण्यावर भन्नाट डान्स केला. 

ट्रेंडिंग न्यूज

Bharti Singh: ३ दिवस सतत त्रास झाल्यानंतर कॉमेडियन भारती सिंह रुग्णालयात दाखल, होणार सर्जरी

सागर आणि मुक्ता यांच्यामध्ये खुलतय प्रेम, काय असेल सावनीचा नवा डाव? 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत आज काय घडणार वाचा

Ajinkya Deo Birthday: अभिनेते अजिंक्य देव यांचा पहिला हॉलिवूड सिनेमा माहिती आहे का? जाणून घ्या त्यांच्याविषयी

'हिच्या पेक्षा तर उर्फी बरी...', करण कुंद्राची गर्लफ्रेंड तेजस्वी प्रकाश कपड्यांमुळे झाली ट्रोल

DID Super Moms च्या ग्रँड फिनालेमध्ये रश्मिका आणि गोविदानं पुष्पा चित्रपटातील सामी-सामी या गाण्यावर डान्स करत कमाल केली. रश्मिकानं या गाण्यावर सिग्नेचर स्टेप्स केल्या, तर गोविंदानं त्याच्या हटके स्टाईलध्ये डान्स करत चाहत्यांना भुरळ पाडली. त्याचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पुष्पा चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर आता चाहत्यांना या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतिक्षा आहे. दुसऱ्या पार्टमध्येही अल्लू अर्जून आणि रश्मिकाची लव्हस्टोरी चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. टॉलिवूडमध्ये नाव कमावल्यानंतर आता रश्मिकानं बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी सुरू केली आहे. कारण आता ती लवकरच गुडबाय चित्रपटात महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रिन शेयर करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.