मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  कास्टिंग दिग्दर्शकाने मला प्रपोज केले अन्...; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

कास्टिंग दिग्दर्शकाने मला प्रपोज केले अन्...; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 24, 2022 12:24 PM IST

yeh rishtey hain pyaar ke: या अभिनेत्रीने करिअरच्या सुरुवातीला तिच्यासोबत जे काही झाले त्याविषयी सांगितले आहे.

कावेरी प्रियम
कावेरी प्रियम (HT)

आजकाल चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री या उघडपणे कास्टिंग काउचचा अनुभव सांगताना दिसतात. काही दिवसांपूर्वी 'ये रिश्ते हैं प्यार के' मालिकेतील अभिनेत्रीने धक्कादायक खुलासा केला आहे. एका दिग्दर्शकाने तिला प्रपोज केले आणि मग तिच्यासोबत गैरवर्तन केले.

'ये रिश्ते हैं प्यार के' मालिकेत काम करणारी कुहू भूमिका साकारणारी अभिनेत्री कावेरी प्रियम सध्या चर्चेत आहे. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने नकारात्मक भूमिका साकारली होती. आता ती 'जिद्द दिल माने ना' या मालिकेत डॉ मोनामीची भूमिका साकारली आहे. आता तिने ईटाइम्सला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने करिअरविषयी अनेक खुलासे केले.
वाचा: त्या दिवशी पहिल्यांदाच मला…; शाहरुखमुळे रितेशला लागली ही सवय

कावेरी मुंबईत आली तेव्हा अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण तेव्हा कावेरीला कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागेल याबाबत माहिती नव्हती. सुरुवातीला कावेरीला कोणीही मदत करणारे नव्हते. ऑडिशन कुठे आणि कसे द्यायचे हे देखील सांगितले नव्हते. तिला अनेक अभिनेत्रींची उदाहरणे देण्यात आली ज्यांनी शॉर्टकट घेतला होता. पण कावेरीने यावर प्रतिक्रिया दिली नाही. तिने मेहनतीने काम मिळवण्याचे ठरवले होते.

कावेरीने या मुलाखतीमध्ये कास्टिंग काउचचा अनुभव देखील सांगितला आहे. एका कास्टिंग दिग्दर्शकाने तिला प्रपोज केले होते आणि या घटनेनंतर तिला धक्काच बसला होता. 'जेव्हा कास्टिंग दिग्दर्शकाने मला प्रपोज केले तेव्हा मी तेथून निघून गेले. मी रिक्षामध्ये बसले, माझ्या डोळ्यात पाणी आले होते. मला अश्रू अनावर झाले होते' असे कावेरी म्हणाली. कावेरीने अभिनेत्री होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली होती. पण तिच्यासोबत चुकीचा व्यवहार देखील केले जात होते.

IPL_Entry_Point

विभाग