मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  KBC 14: मेकॅनिकल इंजिनीअर ७५ लाख रुपयांच्या या प्रश्नाला सोडला खेळ, पाहा काय होता प्रश्न?

KBC 14: मेकॅनिकल इंजिनीअर ७५ लाख रुपयांच्या या प्रश्नाला सोडला खेळ, पाहा काय होता प्रश्न?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 24, 2022 05:20 PM IST

Amitabh Bachchan: स्पर्धकाला या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती होते. तुम्ही देऊ शकाल का योग्य उत्तर?

केबीसी
केबीसी (HT)

माहितीचा स्त्रोत म्हणून पाहिला जाणारा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो म्हणजे कौन बनेगा करोडपती. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन सूत्रसंचालन करत असलेल्या या शोचे सध्या चौदावे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या सिझनमध्ये स्पर्धक बिग बींशी गप्पा मारताना दिसतात. त्यांच्याशी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर करतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये स्पर्धकाने ७५ लाख रुपयांच्या प्रश्नाला खेळ सोडला.

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये करण इंद्रसिंह ठाकोर हे हॉट सीटवर बसले होते. करण मेकॅनिकल इंजिनीअर आहेत. ते शेतीदेखील करतात. केबीसीच्या मंचावर ते त्यांच्या पत्नीसह आले होते. त्यांनी बिग बींच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. बुद्धीमत्तेच्या जोरावर त्यांनी ५० लाख रुपये. पण ७५ लाख रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांना खेळ सोडावा लागला आहे. या प्रश्नापर्यंत त्यांच्या सर्व लाइफलाइन देखील संपल्या होत्या.

काय होता ७५ लाख रुपयांसाठी विचारलेला प्रश्न?

“यापैकी कोणाला त्यांच्या कामासाठी नोबेल पारितोषिक देण्यात आले, जे नंतर चुकीचे असल्याचे सिद्ध झाले?”

पर्याय –

A. ओसवल्ड एव्हरी

B. जोशिया गिब्स

C. गिल्बर्ट एन लुईस

D. जोहान्स फिबिगर

या प्रश्नाचे योग्य उत्तर करण यांना माहिती नव्हते. म्हणून त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल का? या प्रश्नाचे योग्य उत्तर ‘जोहान्स फिबिगर’ हे आहे.

IPL_Entry_Point

विभाग