मराठी बातम्या  /  बिझनेस  /  unclaimed money in LIC : एलआयतही २१,५०० कोटी रक्कम धूळखात, दाव्याविना रकमेसाठी असा करा 'क्लेम'

unclaimed money in LIC : एलआयतही २१,५०० कोटी रक्कम धूळखात, दाव्याविना रकमेसाठी असा करा 'क्लेम'

Apr 10, 2023, 07:05 PM IST

    • unclaimed money in LIC : तुमचे अथवा तुमच्या नातेवाईकांचे पैसे एलआयतीत दाव्याविना पडून आहेत. तर ते क्लेम करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे ते पाहूयात.
LIC HT

unclaimed money in LIC : तुमचे अथवा तुमच्या नातेवाईकांचे पैसे एलआयतीत दाव्याविना पडून आहेत. तर ते क्लेम करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे ते पाहूयात.

    • unclaimed money in LIC : तुमचे अथवा तुमच्या नातेवाईकांचे पैसे एलआयतीत दाव्याविना पडून आहेत. तर ते क्लेम करण्यासाठी कोणती प्रक्रिया आहे ते पाहूयात.

unclaimed money in LIC : रिझर्व्ह बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांमध्ये दावा न केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या हक्काच्या मालकाची ओळख पटवण्यासाठी एक नवीन केंद्रीकृत पोर्टल तयार करण्याची घोषणा केली आहे. त्याच वेळी, दावा न केलेल्या रकमेच्या बाबतीत, सरकारी विमा कंपनी एलआयसी देखील मागे नाही.

ट्रेंडिंग न्यूज

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : कर्ज हे नेहमीच वाईट नसतं; 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

WhatsApp News : व्हॉट्सॲपचं रंग, रूप बदललं! नव्या बटणांनी दिला आकर्षक लुक, तुम्ही पाहिला का?

भारतीय जीवन विमा निगमने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे अंदाजे २१५०० कोटी रुपये विनादावेदार पडून आहेत. एलआयसीने जेंव्हा आपला आयपीओ आणला होता तेंव्हा ही माहिती देण्यात आली होती. एलआयसीकडे सप्टेंबर २०२१ पर्यंत २१,५३९ कोटी रुपयांचा दावा न केलेला निधी होता. जर तुम्हाला हे देखील जाणून घ्यायचे असेल की तुमच्या स्वतःच्या किंवा कोणत्याही नातेवाईकाच्या पॉलिसीवर दावा न केलेला आहे का, तर आम्ही तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया सांगत आहोत.

अनक्लेम अमाऊंट म्हणजे काय

१० वर्षांच्या कालावधीनंतरही विमा कंपनीकडे दावा न केलेली कोणतीही रक्कम दावा न केलेली रक्कम म्हणतात. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (इर्डा) च्या नियमांनुसार, विमा कंपन्यांना १००० रुपये किंवा त्याहून अधिक रकमेची माहिती अद्ययावत ठेवावी लागते.

खरं तर, बरेच लोक बँकांसह एलआयसीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करतात, परंतु काही कारणांमुळे ती मध्यावर मोडावी लागते अथवा मॅच्युरिटीवर पैसे काढायला विसरतात, मग त्याला दावा न केलेली रक्कम म्हणतात आणि ती कंपनीकडे सुरक्षित राहते.

दावा न केलेली रक्कम शोधण्यासाठी प्रक्रिया

पॉलिसी धारकांच्या दावा न केलेल्या रकमेची माहिती देण्यासाठी एलआयसीने त्यांच्या पोर्टलवर एक विशेष साधन दिले आहे. येथे तुम्ही पॉलिसी क्रमांकासह आवश्यक माहिती देऊन दावा न केलेल्या रकमेबद्दल जाणून घेऊ शकतात.

असा करा दावा

एलआयसीच्या संकेतस्थळावर जाऊन अनक्लेम्ड पाॅलीसी ड्यूज पर्यायायवर क्लिक करा. लिक ओपन होताच पाॅलीसी नंबर, पाॅलीसी धारकाचे नाव, जन्मतारीख, पॅनकार्डचे डिटेल्स टाका. ही माहिती दिल्यानंतर, तुम्ही सबमिट बटणावर क्लिक करताच, पॉलिसीशी संबंधित दावा न केलेल्या रकमेची माहिती तुमच्यासमोर येईल.

विभाग