मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Mudra Yojana : मुद्रा योजनेंतर्गत २३.२ लाख कोटींचे कर्जवितरण, व्यवसाय सुरु करण्यासाठी दिले कर्ज

PM Mudra Yojana : मुद्रा योजनेंतर्गत २३.२ लाख कोटींचे कर्जवितरण, व्यवसाय सुरु करण्यासाठी दिले कर्ज

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 10, 2023 07:04 PM IST

PM Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, सरकारने ४०.८२ कोटींहून अधिक लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे.

PM mudra Yojana HT
PM mudra Yojana HT

PM Mudra Yojana : प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत, सरकारने ४०.८२ कोटींहून अधिक लोकांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले आहे. अर्थ मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकारने गेल्या ८ वर्षांत ४०.८२ कोटींहून अधिक लोकांना २३.२ लाख कोटी रुपयांची रक्कम वितरित केली आहे. सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या मुद्रा योजनेअंतर्गत तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही १० लाख रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेत रस्त्यावरील विक्रेते आणि लहान व्यावसायिकांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज वितरण करणे हे योजनेमागचे उदिष्ट आहे.

कर्ज घेण्यासाठी व्यवसाय योजना सांगावी लागेल

सर्वात आधी अर्जदाराने व्यवसाय योजना तयार करणे आवश्यक आहे. यासोबतच कर्जासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रे तयार करावी लागतात. नेहमीच्या कागदपत्रांसोबतच बँक तुमच्या व्यवसाय योजना, प्रकल्प अहवाल, भविष्यातील उत्पन्नाचे अंदाज यासंबंधीची कागदपत्रेही अर्जदाराला सादर करावी लागतात.

व्याजाची टक्केवारी

मुद्रा कर्जाची खास गोष्ट म्हणजे यात कोणताही निश्चित व्याजदर नाही. वेगवेगळ्या बँका कर्जावर वेगवेगळे व्याज आकारू शकतात. व्याजदर व्यवसायाचे स्वरूप आणि त्याच्याशी निगडीत जोखीम या आधारावर ठरवले जातात. सर्वसाधारणपणे व्याज दराची ही टक्केवारी अंदाजे १० ते १२ टक्के आहे.

कर्ज घेण्यासाठी कोणतीही हमी नाही

२०१५ मध्ये सुरू झालेल्या या योजनेचे उद्दिष्ट रस्त्यावरील विक्रेते आणि लहान व्यावसायिकांना कोणत्याही हमी अथवा तारणाशिवाय कर्ज देणे हे आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करू करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला या योजनेअंतर्गत कर्ज मिळू शकते. यासोबतच जर एखाद्याला त्याचा सध्याचा व्यवसाय पुढे करायचा असेल तर त्याला या योजनेद्वारे कर्जही मिळू शकते.

मुद्रा योजेनेसाठी असा करा अर्ज

- तुम्हाला कोणत्या बँक/वित्तीय संस्थेकडून कर्ज घ्यायचे आहे ते ठरवा. अर्जदार एकापेक्षा जास्त बँक निवडू शकतात. भरलेला कर्ज अर्ज कागदपत्रांसह बँकेत जमा करणे आवश्यक आहे.

- मुद्रा कर्जासाठी अर्जासोबत तुम्हाला व्यवसाय योजना किंवा प्रकल्प अहवाल, ओळखपत्रे जसे की पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र इत्यादी दस्तावेज सादर करणे गरजेचे आहे. सर्व दस्तावेजांची पडताळणी झाल्यावर तुम्हाला मुद्रा डेबिट कार्ड जारी केले जाईल. जेणेकरुन तुम्हाला आर्थिक व्यवहार करता येतील.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग