मराठी बातम्या  /  बिझनेस  /  unclaimed Rupees in Bank : या खात्यांचे दावेदार कोण ? देशातील बँकांमध्ये इतके कोटी रुपये तसेच पडून

unclaimed Rupees in Bank : या खात्यांचे दावेदार कोण ? देशातील बँकांमध्ये इतके कोटी रुपये तसेच पडून

Apr 04, 2023, 07:55 PM IST

    • unclaimed deposits in Bank :  देशातील विविध बँकांमध्ये फेब्रुवारी २०२३ पर्यंत ३५,०१२ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत.
money HT

unclaimed deposits in Bank : देशातील विविध बँकांमध्ये फेब्रुवारी २०२३ पर्यंत ३५,०१२ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत.

    • unclaimed deposits in Bank :  देशातील विविध बँकांमध्ये फेब्रुवारी २०२३ पर्यंत ३५,०१२ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत.

unclaimed deposits in Bank : देशातील विविध बँकांमध्ये फेब्रुवारी २०२३ पर्यंत ३५,०१२ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत. सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, एक वर्षापूर्वी म्हणजेच मार्च २०२२पर्यंत बँकांकडे ४८,२६२ रुपये पडून होते. याचा अर्थ, बँकांमधील दावा न केलेल्या ठेवींमध्ये १३२५० कोटी रुपयांची घट झाली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Ratan Tata : शेवटच्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचा मुंबईकरांना खास आवाहन

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

दावा न केलेली ही रक्कम बचत किंवा चालू खात्यांमध्ये जमा रक्कम आहे. गेल्या १० वर्षांपासून ती पडून आहे आणि या कालावधीत या खात्यांतून कोणतेही व्यवहार झालेले नाहीत. ही खाती निष्क्रिय झाली आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी फेब्रुवारी २०२३ पर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये हस्तांतरित केलेल्या एकूण बेहिशेबी ठेवी ३५०१२ कोटी होत्या, असे वित्त राज्यमंत्री भागवत कराड यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात सांगितले. गेल्या वर्षी मार्च २०२२ मध्ये हा आकडा ४८२६२ कोटी रुपये होता. बँकांनी दावा न केलेल्या या ठेवींची संख्या आणि रक्कम रिझर्व्ह बॅंकेला कळवणे आवश्यक असते. दावा न केलेल्या या रकमा नंतर रिझर्व्ह बँकेच्या ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधीमध्ये हस्तांतरित केल्या जातात.

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वाधिक ८०८६ कोटी रुपयांच्या हक्क न केलेल्या ठेवी आहेत. याशिवाय पंजाब नॅशनल बँकेकडे ५३४० कोटी रुपये, कॅनरा बँकेकडे ४५५९ कोटी रुपये आणि बँक ऑफ बडोदाकडे ३, ९०४ कोटी रुपये पडून आहेत.

आरबीआयने जुलै २०१४ मध्ये जारी केलेल्या परिपत्रकानुसार, ज्या खात्यांमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झालेला नाही, अशा खात्यांचा वार्षिक आढावा बँकांनी घेणे आवश्यक आहे. बँका या ग्राहकांशी संपर्क साधू शकतात आणि खात्यात कोणतेही व्यवहार झाले नाहीत, असे त्यांना लेखी कळवू शकतात.

निष्क्रिय झालेल्या खात्यांच्या मालकांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्याच्या सूचना बॅंकाना देण्यात आल्या आहेत. वेबसाइटवर निष्क्रिय खात्यांची यादी, संबंधित खातेदारांची नावे व पत्ते जाहीर करणेही बॅंकांना अनिवार्य करण्यात आले आहे.

विभाग

पुढील बातम्या