मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Reliance Jio: बिगर वित्तीय क्षेत्रात रिलायन्सची उडी, 'जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस"ची स्थापना करणार

Reliance Jio: बिगर वित्तीय क्षेत्रात रिलायन्सची उडी, 'जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस"ची स्थापना करणार

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 04, 2023 07:17 PM IST

Reliance Jio : बॅंकेतर वित्त (एनबीएफसी) या क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीज उत्सुक असून आपल्या वित्तीय सेवा विभागाच्या विलगीकरणास मान्यता देण्यासाठी २ मे रोजी भागधारकांची बैठक घेणार आहे.

MUkesh Ambani HT
MUkesh Ambani HT

Reliance Jio : बॅंकेतर वित्त (एनबीएफसी) या क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या दृष्टीने रिलायन्स इंडस्ट्रीज उत्सुक असून आपल्या वित्तीय सेवा विभागाच्या विलगीकरणास मान्यता देण्यासाठी २ मे रोजी भागधारकांची बैठक घेणार आहे.

रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट या आपल्या वित्तीय सेवा शाखेच्या विलगीकरणावर विचार करण्यासाठी आणि ते मंजूर करण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजने भागधारक आणि कर्जदारांची बैठक बोलावली आहे. स्टॉक एक्सचेंजेसला सादर केलेल्या दस्तऐवजानुसार, रिलायन्सने एक स्वतंत्र कंपनी तयार करण्याचे ठरविले असून तिचे नाव बदलून जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस असे केले जाणार आहे.

सिंटेक्स इंडस्ट्रीज या कंपनीचे अधिग्रहण करण्यासाठी नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने रिलायन्स आणि अॅसेट्स केअर अँड रिकन्स्ट्रक्शन एंटरप्राइझ यांना गेल्या आठवड्यात मान्यता दिली. यातून या कंपनीचे इतर क्षेत्रांत जाण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसते.

तथापि गेल्या वर्षभरापासून रिलायन्सच्या शेअरच्या भावात निर्देशांकाच्या तुलनेत फार वाढ झालेली नाही. रिलायन्समध्ये ज्या विदेशी वित्तसंस्थांनी गुंतवणूक केली आहे, त्यांच्या भांडवलावर ऊर्जेच्या किमतींमधील अस्थिरता आणि जादाचे व्याजदर यांचा परिणाम झाला आहे. त्यांनी रिलायन्समधील आपला हिस्सा किरकोळ प्रमाणात कमी केला आहे.

रिलायन्सचा स्टाॅक वधारला

या पार्श्वभूमीवर एनबीएफसीच्या क्षेत्रात जाण्याबद्दल रिलायन्सच्या मोठ्या योजना आहेत. हे लक्षात आल्यानेच आता रिलायन्सचा स्टॉक आता वधारू लागला आहे. मागील आठवड्यात तो ५ टक्क्यांनी वाढून २३०० वर पोहोचला आहे आणि पुढील वर्षभरात ३० टक्क्यांनी वाढून ३००० पर्यंत जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वित्तीय सेवा क्षेत्राबद्दल आशा

तेल शुद्धीकरणाच्या क्षेत्रात वर्चस्व गाजवल्यानंतर रिलायन्सने दूरसंचार आणि रिटेल या क्षेत्रातही आपला दबदबा निर्माण केला. आता एक उद्योग म्हणून रिलायन्स वित्तीय सेवा क्षेत्राविषयी बऱ्यापैकी आशा बाळगून आहे. याचे कारण, गेल्या १० वर्षांत, बॅंकेतर वित्त उद्योग वर्षाकाठी १७ टक्के दराने वाढत आहे. सध्या बजाज फायनान्स आणि चोलामंडलम फायनान्स या सर्वात मोठ्या एनबीएफसी आहेत. त्यांचे बाजार भांडवल अनुक्रमे ३.४ लाख कोटी आणि ६२५०० कोटी रुपये इतके आहे. या दोन्ही महत्त्वाकांक्षी कंपन्या आहेत. त्यांच्याही विस्ताराच्या मोठ्या योजना आहेत.

त्यामुळेच वित्तीय सेवा क्षेत्रात या कंपनीला कितपत यश मिळेल, याविषयी काही तज्ज्ञांकडून शंका व्यक्त केल्या जात आहेत. तसेच सध्या वित्तीय सेवा नव्याने सुरू करण्यासाठी विशेष अनुकूल वातावरणही नाही, असे सांगितले जाते.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग