मराठी बातम्या  /  बिझनेस  /  tata Technology IPO : टाटाच्या या आयपीओची धूम, लिस्टिंगच्या आधीच ८३० रुपयांचा मिळाला भाव

tata Technology IPO : टाटाच्या या आयपीओची धूम, लिस्टिंगच्या आधीच ८३० रुपयांचा मिळाला भाव

Apr 17, 2023, 02:30 PM IST

    • tata Technology IPO : शेअऱ बाजारात गुंतवणूकदारांसाठी कमाईची चांगली संधी खुली झाली आहे. वास्तविक, लवकरच टाटा समुहातील एका कंपनीचा आयपीओ येत आहे.
tata group HT

tata Technology IPO : शेअऱ बाजारात गुंतवणूकदारांसाठी कमाईची चांगली संधी खुली झाली आहे. वास्तविक, लवकरच टाटा समुहातील एका कंपनीचा आयपीओ येत आहे.

    • tata Technology IPO : शेअऱ बाजारात गुंतवणूकदारांसाठी कमाईची चांगली संधी खुली झाली आहे. वास्तविक, लवकरच टाटा समुहातील एका कंपनीचा आयपीओ येत आहे.

tata Technology IPO : शेअऱ बाजारात गुंतवणूकदारांसाठी कमाईची चांगली संधी खुली झाली आहे. वास्तविक, लवकरच टाटा समुहातील एका कंपनीचा आयपीओ येत आहे. नुकतेच टाटा मोटर्सच्या संलग्न कंपनी टाटा टेक्नाॅलाॅजीजने आयपीओ दाखल करण्यासाठी सेबीकडे डीआरएचपी सादर केला आहे. डीआरएचपीनुसार, टाटा मोटर्सने टाटा टेक्नाॅलाॅजीजचे ८,११,३३,७०६ शेअरची विक्री करण्याची तयारी केली आहे.

ग्रे मार्केटमध्ये वाढतोय भाव

बाजारातील अंदाजानुसार, टाटा टेक्नाॅलाॅजीजचे बाजार भांडवल अंदाजे १८ हजार ते २० हजार कोटींच्या घरात आहे.यादरम्यान, टाटा टेक्नाॅलाॅजीच्या शेअर्सचे मूल्य ८३० रुपयांच्या दरम्यान ट्रेड करत आहे. टाटा टेक्नाॅलाॅजीजचे शेअर्स सूचीबद्ध होण्यापूर्वीच ८३० रुपयांच्या पातळीवर पोहोचले आहेत. तर दुसरीकडे आयपीओचे अंतिम प्राईस बँड अद्याप निश्चित होणे बाकी आहे. मात्र गुंतवणूकदार या शेअर्समध्ये रस घेत आहेत.

प्राईस बँड इतकी असण्याची शक्यता

टाटा टेक्नाॅलाॅजीजचा आयपीओ व्हॅल्यूएशनच्या आधारावर निश्चित केली जाऊ शकते. यासंदर्भात एरिना डाॅट काॅमचे संस्थापक अभ. दोशी म्हणाले की, टाटा टेक्नाॅलाॅजीजच्या आयपीओचा प्राईस बँड ७०० ते ८८० रुपयांच्या दरम्यान असण्याची शक्यता आहे.

विभाग