मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Buy TCI Share : ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशनच्या शेअर्सवर तज्ज्ञ बुलिश, शेअर खरेदीसाठी हे आहे 'टार्गेट'

Buy TCI Share : ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशनच्या शेअर्सवर तज्ज्ञ बुलिश, शेअर खरेदीसाठी हे आहे 'टार्गेट'

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 17, 2023 01:13 PM IST

Buy TCI Share : लॉजिस्टिक क्षेत्रातील स्मॉल कॅप कंपनी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (टीसीआय) १९९५ पासून बाजारपेठेत ट्रेड करत आहे. लॉजिस्टिक क्षेत्रातील या कंपनीचे एकूण मार्केट कॅप ४७६२.४० कोटी रुपये आहे.

TCI Express HT
TCI Express HT

Buy TCI Share : वस्तू लहान असो वा अवजड, त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचे काम टीसीआय ही लॉजिस्टिक क्षेत्राशी निगडित कंपनी करते. लाॅजिस्टिक क्षेत्रातील टीसीआय एक्सप्रेस आणि ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशन या दोन मल्टिबॅगर शेअर्स खरेदीचा कौल आयसीआयसीआय डायरेक्टने दिला आहे.

टीसीआय एक्सप्रेस

ब्रोकरेज हाऊसेसने टीसीएक्स एक्सप्रेसला प्राधान्य दिले असून शेअर खरेदीचा सल्ला दिला आहे. ब्रोकरेजने स्टॉकची किंमत २१५० रुपये निर्धारित केली आहे.सध्या हा स्टाॅक १५०० रुपयांवर ट्रेड करत आहे.

आर्थिक स्थिती

मिडकॅप टीसीआय एक्सप्रेस स्टॉकचे एकूण बाजारमूल्य ५७४६.७५ कोटी आहे. डिसेंबर २०२२ मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीने स्टँडअलोन एकूण उत्पन्न म्हणून ३१५.७२ कोटी रुपये नोंदवले आहेत. हे प्रमाण मागील तिमाहीच्या तुलनेत १.१४ टक्के अधिक आहे. नव्या तिमाहीत करपश्चात निव्वळ नफा ३२.०२ कोटी आहे.

ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशन आँफ इंडिया

दुसरा स्टॉक म्हणून ब्रोकरेजने ट्रान्सपोर्ट काॅर्पोरेशन आँफ इंडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. १९९५ पासून लॉजिस्टिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या स्टॉकवर देखील ८१० रुपयांची लक्ष्य किंमत निश्चित करण्यात आली आहे.

आर्थिक स्थिती

स्मॉल कॅप कंपनी ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीत एकत्रित एकूण उत्पन्न म्हणून ९७३.७५ कोटी रुपयांची नोंदणी केली आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. नवीन तिमाहीत करपश्चात नफा अंदाजे ७६.४२ कोटींचा निव्वळ नफा नोंदविला आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग