मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Infosys Share : खराब निकालानंतर Infosys शेअर्सचे काय करावे? ब्रोकरेज हाऊसेसनी सांगितली 'स्ट्रॅटेजी'

Infosys Share : खराब निकालानंतर Infosys शेअर्सचे काय करावे? ब्रोकरेज हाऊसेसनी सांगितली 'स्ट्रॅटेजी'

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 17, 2023 09:40 AM IST

Infosys share price : इन्फोसिसच्या तिमाही आधारावर नफ्यात ७% घट झाली. महसुलातही २.३% ची घट नोंदवली गेली. खराब निकालांच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी करावे की विकावे याबाबत ब्रोकरेज हाऊसेसनी सल्ला दिला आहे.

infosys HT
infosys HT

Infosys Share price : मार्च तिमाहीत कंपनीच्या करपश्चात नफ्यामध्ये ४.३% ची घसरण नोंदवण्यात आली आहे. कंपनीचे मार्जिन ५० बेसिस पॉइंट्सने घसरले असून ते २१.५% वरून २१% पर्यंत कमी झाले. तिमाही आधारावर नफ्यात ७% घट झाली.

ट्रेंडिंग न्यूज

शेअर बाजारात निकालाचा हंगाम सुरू झाला आहे. आयटी क्षेत्रातील दिग्गज इन्फोसिस (Infosys Q4 Results) ने मार्च तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचा निव्वळ नफा तिमाही आधारावर ७% ने कमी होऊन ६,१२८ कोटी रुपये झाला आहे. महसूलातही २.३% घट झाली आहे. कंपनीने ५ रुपयांच्या दर्शनी मूल्यावर ३५०% म्हणजेच १७.५० रुपये प्रति शेअर लाभांशही जाहीर केला आहे.

यंदाच्या तिमाहीतील कंपनीचे निकाल बाजाराच्या अंदाजापेक्षा परिणाम कमकुवत होते. यामुळेच इन्फोसिसचा एडीआर ९% पर्यंत तुटला होता. अशा स्थितीत देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीच्या शेअर्सचे काय करायचे? असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.

ब्रोकरेजचे मत

जे पी माॅर्गनने इन्फोसिससाठी १२०० रुपयांचे टार्गेट दिले आहे. तर सिटीने तटस्थ रेटिंगसह टार्गेट प्राईस १४०० रुपयांचे दिले आहे. माॅर्गन स्टेनलेने ओव्हररेटिंग दिले आहे. कंपनीसाठी अंदाजे १४७५ रुपयांचे टार्गेट प्राईस दिले आहे. नोमुराने रेटिंग तटस्थ दिले असून टार्गेट प्राईस १२९० रुपये दिले आहे.

इन्फोसिस चौथ्या तिमाहीचे निकाल

मार्च तिमाहीत कंपनीच्या करपश्चात नफ्यामध्ये तब्बल ४.३% ची घसरण नोंदवली गेली. तर मार्जिनमध्ये ५० बेसिस पॉइंट्सने घट झाली आहे. तिमाही आधारावर नफ्यात ७% घट झाली. महसुलातही २.३% ची घट नोंदवली गेली. अॅट्रिशन रेटमध्ये मोठी घट झाली आहे. ते तिमाही आधारावर २४.३% वरून २०.९% पर्यंत कमी झाले. दरम्यान Infosys ने गुंतवणूकदारांना प्रति शेअर १७.५० रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षातील हा तिसरा लाभांश आहे.

WhatsApp channel

विभाग