मराठी बातम्या  /  बिझनेस  /  tata motors : टाटा मोटर्सच्या या गाड्या १ मे पासून होणार महाग, कंपनीने केली घोषणा

tata motors : टाटा मोटर्सच्या या गाड्या १ मे पासून होणार महाग, कंपनीने केली घोषणा

Apr 15, 2023, 08:47 PM IST

    • tata motors : टाटा मोटर्स कंपनीने येत्या १ मे पासून या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता टाटा मोटर्सच्या गाड्या सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत.
tata motors HT

tata motors : टाटा मोटर्स कंपनीने येत्या १ मे पासून या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता टाटा मोटर्सच्या गाड्या सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत.

    • tata motors : टाटा मोटर्स कंपनीने येत्या १ मे पासून या वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता टाटा मोटर्सच्या गाड्या सवलतीच्या दरात खरेदी करण्यासाठी शेवटचे १५ दिवस उरले आहेत.

tata motors : टाटा मोटर्सने पुन्हा एकदा दरवाढीचा मोठा धक्का दिला आहे. येत्या १ मे पासून कंपनी आपल्या सर्व प्रवासी वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करणार आहे. कंपनीने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, कंपनीने सर्व व्हेरियंट्स आणि माॅडेलनुसार, ०.६ टक्के वाढ केली आहे. त्यामुळे जर तुम्ही नेक्साॅन, पंच, टियागो, अल्ट्रोज आणि इतर कार, एसयूव्ही मे महिन्याच्या आत खरेदी केल्यास फायदा होऊ शकतो.

कंपनीने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, १ मे २०२३ पासून कंपनीच्या संपूर्ण उत्पादन श्रेणीत सरासरी ०.६ टक्के वाढ होईल. नियामक बदलांमुळे आणि एकूण उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे किंमत वाढवावी लागली आहे. ही वाढ विविध प्रकार आणि मॉडेलनुसार बदलेल. नियामक बदलांमुळे आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असे त्यात म्हटले आहे.

टाटा मोटर्स भारतीय बाजारपेठेत पेट्रोल तसेच डिझेल आणि इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करते. हॅरियर आणि सफारी फक्त डिझेल इंजिन पर्यायात आहेत. त्याच वेळी, Tiago EV, Tigor EV, Nexon EV Prime आणि Nexon EV Max सारख्या इलेक्ट्रिक कार लोकांच्या पसंतीस पडत आहेत. नेक्सॉन आणि पंच सारख्या एसयूव्ही टाटा मोटर्सच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. त्याच वेळी, हॅचबॅक सेगमेंटमध्ये सर्वात स्वस्त टियागो तसेच प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझ आहे. तुम्ही देखील नवीन टाटा कार घेण्याचा विचार करत असाल तर या महिन्यातच खरेदी करण्याची चांगली शक्यता आहे, अन्यथा पुढील महिन्यापासून तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागतील.

विभाग