मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Tata motors : टाटा मोटर्सच्या ‘या’ गाडीने रचला इतिहास, ५ लाखावी एसयूव्ही गाडी प्रकल्पाबाहेर

Tata motors : टाटा मोटर्सच्या ‘या’ गाडीने रचला इतिहास, ५ लाखावी एसयूव्ही गाडी प्रकल्पाबाहेर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Apr 12, 2023 07:23 PM IST

Tata motors : टाटा मोटर्सच्या या सबकाॅम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमधील गाडीने कमी कालावधीत कमालीची लोकप्रियता सिद्ध केली. त्यामुळेच आज या पुण्यातील रांजणगाव प्रकल्पातून ५ लाखावी गाडी बाहेर पडली आहे.

tata motors HT
tata motors HT

Tata motors : टाटा नेक्साॅनचे नाव देशाच्या लोकप्रिय सबकाॅम्पॅक्ट एसयूव्हीच्या लिस्टमध्ये येते. गेल्या अनेक वर्षांपासून ही सबकाॅम्पॅक्ट एययूव्ही गाडी लोकांच्या मनावर राज्य करत आहे. यासाठी टाटा मोटर्सने आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करुन टाटा नेक्साॅनच्या ५ लाखावी गाडी उत्पादन प्रकल्पातून बाहेर पडत असल्याचा आनंद सर्वांसोबत शेअर केला.

नेक्साॅनची पहिली गाडी २०१७ मध्ये दाखल

टाटा नेक्साॅनला कंपनीने २०१७ मध्ये पहिल्यांदा दाखल केले होते. त्यावेळी गाडीची किंमत ५.८५ लाख रुपये होती. गेल्या सहा वर्षांच्या कालावधीत नेक्साॅनला कंपनीने विविध व्हेरियंट्समध्ये दाखल केले आहे.

टाटा नेक्साॅन ईव्ही दाखल

कोरोनाच्या २०२० मध्येही कंपनीने नेक्साॅनचे ईलेक्ट्रिक व्हेरियंट दाखल केले. या गाडीमध्ये कम्फर्टसह सब काॅम्पॅक्ट एसयूव्हीचे सर्व फिचर्स उपलब्ध आहेत. यात एअर प्युरिफिकेशन सिस्टिम, रिव्हर्स कॅमेरा, कनेक्टेड कार टेक्नाॅलाॅजी, वाॅईस कमांडसहित अनेक अत्याधुनिक फिचर्सचा समावेश आहे. त्याशिवाय यात इको, स्पोर्ट्स असे विविध ड्राईव्हिंग मोड्सही देण्यात आले आहेत.

tata nexon facelift HT
tata nexon facelift HT

नेक्साॅन फेसलिफ्ट दाखल करण्याची तयारी

टाटा नेक्सॉनची फेसलिफ्ट आवृत्ती लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. यासोबतच कंपनी नवीन नेक्सॉनचीही चाचणी करत आहे. या नव्या फेसलिफ्ट आवृत्तीमध्ये इंटिरिअर आणि एक्सटिरिअरमध्ये अनेक प्रकारचे बदल केले जाणार आहेत.. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एसयूव्हीच्या स्टिअरिंगमध्येही बदल होऊ शकतो. यासोबतच यात जांभळ्या रंगाच्या सीटसह ड्युअल टोन इंटीरियर देण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये ३६० डिग्री कॅमेरा, सनरूफ, सात इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, एअर प्युरिफायर सारखे फीचर्स देखील दिले जाऊ शकतात. दरम्यान या फेसलिफ्ट व्हर्जनच्या किंमतीबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

WhatsApp channel

विभाग