मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI Credit Card : एसबीआय क्रेडिट कार्डचा असा झाला सावळागोंधळ, कार्ड एक्सपायर होऊनही ठोठावला दंड

SBI Credit Card : एसबीआय क्रेडिट कार्डचा असा झाला सावळागोंधळ, कार्ड एक्सपायर होऊनही ठोठावला दंड

May 25, 2023, 11:12 PM IST

    • SBI Credit Card : ग्राहकांच्या मते, क्रेडिट कार्डची मुदत संपूनही त्यांना बील पाठवले आणि शुल्क न भरल्याने त्यांना प्रतिबंधित सुचीमध्ये टाकण्यात आले. यामुळे संबंधित ग्राहकाचा सिबील स्कोअरही खराब झाला.
SBI credit Card HT

SBI Credit Card : ग्राहकांच्या मते, क्रेडिट कार्डची मुदत संपूनही त्यांना बील पाठवले आणि शुल्क न भरल्याने त्यांना प्रतिबंधित सुचीमध्ये टाकण्यात आले. यामुळे संबंधित ग्राहकाचा सिबील स्कोअरही खराब झाला.

    • SBI Credit Card : ग्राहकांच्या मते, क्रेडिट कार्डची मुदत संपूनही त्यांना बील पाठवले आणि शुल्क न भरल्याने त्यांना प्रतिबंधित सुचीमध्ये टाकण्यात आले. यामुळे संबंधित ग्राहकाचा सिबील स्कोअरही खराब झाला.

SBI Credit Card : क्रेडिट कार्ड एक्सपायर झाल्यानंतरही एसबीआय कार्ड्स आणि पेमेंट्स सर्व्हिसेसने ग्राहकाला बील पाठवले. या प्रकरणी दिल्लीतील एका ग्राहक न्यायालयाने एसबीआय कार्डावर २ लाखांचा दंड ठोठावला आहे. नवी दिल्लीतील ग्राहक विवाद निवारण मंचाने क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपनीला निर्देश दिले आहेत. त्यानुसार, ग्राहकाला सेवामध्ये निर्माण झालेल्या त्रूटीबद्दल भूर्दंड द्यावा.

ट्रेंडिंग न्यूज

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : कर्ज हे नेहमीच वाईट नसतं; 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

सिबिल स्कोअरही खराब

ग्राहकाच्या तक्रारीमध्ये सांगण्यात आले होते की, क्रेडिट कार्डाची मुदत संपल्यानंतरही त्यांना बील पाठवण्यात आले होते. शुल्क न दिल्याने त्यांना प्रतिबंधित सुचीत टाकण्यात आले. यामुळे ग्राहकाचा सिबील स्कोअरही खराब झाला. यामुळे संबंधित ग्राहकाला दुसऱ्या बँकेतूनही कर्ज नाकारण्यात आले.

भरपाई नाही तर भूर्दंड आवश्यक

मोनिका श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखालील ग्राहक हक्क सुरक्षा मंचाने सांगितले की, तक्रारदाराला सेवा देण्यात अपयशी ठरलेल्या आणि क्रेडिट रेटिंग खराब झाल्याने नुकसानाची भरपाई पैशाच्या रुपात केली जाऊ शकत नाही. पण क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या एसबीआय क्रेडिट कार्डाविरोधात दंडात्मक कारवाई आवश्यक होती. त्यामुळे एसबीआय कार्ड्सला दोन महिन्याच्या आत तक्रारदाराला दोन लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विभाग