मराठी बातम्या  /  बिझनेस  /  SBI bank customer : एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी धोक्याची सुचना, अन्य़था बिघडेल सगळं गणित

SBI bank customer : एसबीआय बँकेच्या ग्राहकांसाठी धोक्याची सुचना, अन्य़था बिघडेल सगळं गणित

May 18, 2023, 03:36 PM IST

    • SBI bank customer : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अन्य़था थोडीशी चूक परिस्थिती खराब करू शकते.
SBI HT

SBI bank customer : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अन्य़था थोडीशी चूक परिस्थिती खराब करू शकते.

    • SBI bank customer : तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. अन्य़था थोडीशी चूक परिस्थिती खराब करू शकते.

SBI bank customer : तुमचे खाते एसबीआय बँकेत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. अनेक संशयास्पद हालचालींमुळे तुमचे एसबीआय़ खाते तात्पुरते बंद केले जात आहे, अशा आशयाचा मेसेज अनेक एसबीआयच्या ग्राहकांच्या मोबाईलवर येत आहे. हा मेसेज स्कॅमर्सकडून पाठवला जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Silver rate today : चांदीच्या भावानं मोडला आतापर्यंतचा उच्चांक, सोन्याच्या किंमतीत घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

narayana murthy on AI : आर्टिफिशल इंटेलिजन्समुळं नोकऱ्या जाणार?; प्रसिद्ध उद्योजक नारायणमूर्ती काय म्हणाले पाहा!

stocks to buy or sell : शेअर बाजारात आज आठवड्याचा शेवटचा दिवस! 'या' ५ स्टॉक्सवर ठेवा नजर

Smartphone Under 20000: रिअलमीपासून ते वनप्लसपर्यंत; मे महिन्यात २० हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च झालेले स्मार्टफोन!

जर तुम्हालाही असाच मेसेज येत असेल तर त्या मेसेजला प्रतिसाद देऊ नका, त्वरित सायबर क्राईमशी संपर्क साधावा. सरकारच्या अधिकृत फॅक्ट चेकडकून एसबीआयच्या मेसेजवरुन सतर्क राहण्यात सांगितले आहे.

इथे करा तक्रार

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एसबीआयच्या ग्राहकांना एक संदेश पाठवला जात आहे, ज्यामध्ये तुमचे खाते तात्पुरते लॉक केले जाईल. अशा संदेशांना किंवा ईमेलला कधीही उत्तर देऊ नये आणि बँकिंग माहिती जाहीर करू नये, असे पीआयबीने सांगितले आहे. तुम्हाला अशी कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास report.phishing@sbi.co.in वर कळवा.

लिंकवर क्लिक केल्यानंतर काय होईल

स्कॅमरने पाठवलेल्या या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे गहाळ होण्याचा धोका वाढेल. स्कॅमर तुमचा वैयक्तिक डेटा चोरून बँक खात्यातून पैसे काढू शकतो. अशा परिस्थितीत अशा अज्ञात लिंकवर कधीही क्लिक करू नये.

विभाग

पुढील बातम्या