मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Maruti Fronex : मारुति फ्रॉन्क्स पाहून व्हाल क्रेझी, या जबदस्त फिचर्स आणि लूक्सनी तरुणांना केलं घायाळ

Maruti Fronex : मारुति फ्रॉन्क्स पाहून व्हाल क्रेझी, या जबदस्त फिचर्स आणि लूक्सनी तरुणांना केलं घायाळ

Apr 25, 2023, 02:28 PM IST

    • Maruti Fronex : मारुति कंपनीने यंदाच्या दिल्ली आॅटो एक्सपोमध्ये जिम्नी आणि फ्रॉन्क्स या दोन काॅम्पॅक्ट एसयूव्ही सादर केल्या होत्या. कंपनीने आज फ्रॉन्क्स अधिकृतरित्या भारतीय बाजारपेठेत उतरवली आहे. पहा या गाडीची किंमत -
Maruti_Suzuki_Fronx

Maruti Fronex : मारुति कंपनीने यंदाच्या दिल्ली आॅटो एक्सपोमध्ये जिम्नी आणि फ्रॉन्क्स या दोन काॅम्पॅक्ट एसयूव्ही सादर केल्या होत्या. कंपनीने आज फ्रॉन्क्स अधिकृतरित्या भारतीय बाजारपेठेत उतरवली आहे. पहा या गाडीची किंमत -

    • Maruti Fronex : मारुति कंपनीने यंदाच्या दिल्ली आॅटो एक्सपोमध्ये जिम्नी आणि फ्रॉन्क्स या दोन काॅम्पॅक्ट एसयूव्ही सादर केल्या होत्या. कंपनीने आज फ्रॉन्क्स अधिकृतरित्या भारतीय बाजारपेठेत उतरवली आहे. पहा या गाडीची किंमत -

Maruti Fronex : मारुति सुझुकी इंडियाने आपली नवी काॅम्पॅक्ट एसयूव्ही फ्रॉन्क्स भारतीय बाजारपेठेत आजपासून अधिकृतरित्या दाखल करण्यात येत असल्याचे जाहीर केले. कंपनी त्यांच्या नेक्सा रिटेल स्टोअरच्या माध्यमातून या काॅम्पॅक्ट एसयूव्हीची विक्री करेल. मारुतिने यंदाच्या वर्षी जानेवारी महिन्यात झालेल्या आॅटो एक्सपोमध्ये जिम्नी आणि फ्रॉन्क्स सादर केली होती. तेंव्हापासूनच ग्राहक या गाडीच्या दाखलीकरणासाठी वाट पाहत होते. त्यांची आज प्रतिक्षा संपली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

China Gold Purchase : सोनं महाग होण्यामागे चीनचा हात, नेमकं काय करतोय चिनी ड्रॅगन

Amazon Summer Sale: कडक उन्हाळ्यात थंड हवेचा आनंद; एसीच्या खरेदीवर अ‍ॅमेझॉन देतोय ५५ टक्के सूट!

NBFC FD Rates : 'या' पाच वित्तीय कंपन्या एफडीवर देतायत ७ टक्क्यांपेक्षा जास्त व्याज, जाणून घ्या सविस्तर

Business Ideas : कर्ज हे नेहमीच वाईट नसतं; 'मसाला किंग' धनंजय दातार सांगतायत स्वानुभव

हे आहेत फिचर्स

नवीन फ्रॉन्क्स (Fronx) १.०-लिटर के सिरीज टर्बो बुस्टरजेट डायरेक्ट इंजेक्शन इंजिनसह येते. ही गाडी प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह येते. यामध्ये तुम्हाला ५ -स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्याय मिळतात. फ्रॉन्क्स अॅडव्हान्स १.२ लीटर ड्युएलजेट ड्युल व्हीव्हीटी इंजिनसह येते. यामध्ये तुम्हाला ५-स्पीड मॅन्युअल आणि ५-स्पीड एजीएस ट्रान्समिशन मिळते.

मारुति सुझुकीच्या हार्टटेक प्लॅटफाॅर्मवर तयार फ्रॉन्क्समध्ये सहा एअऱ बॅग्ज, ३ प्वाईंट ईएलआर सीट बेल्ट, ईपीएस, हील होल्ड असिस्ट, आणि रोल ओव्हर मिटिगेशन देण्यात आले आहेत.

या कारमध्ये, तुम्हाला टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसह हेड-अप डिस्प्ले, ३६०-डिग्री व्ह्यू कॅमेरा, वायरलेस स्मार्टफोन चार्जर आणि वायरलेस अॅपल कार प्ले आणि अँड्राॅईड आँटो कनेक्टिव्हिटीसह 9-इंच एचडी स्मार्ट प्ले प्रो प्लस इन्फोटेनमेंट सिस्टम मिळेल.

१० व्हेरियंट्सच्या वेगवेगळ्या किंमती

मारुती फ्रॉन्क्स एकूण १० पर्यायांमध्ये उपलब्ध असतील. त्याची एक्स-शोरूम किंमत ७,४६,५०० रुपयांपासून सुरू होते आणि १२,९७,५०० रुपयांपर्यंत जाते. फ्रॉन्क्स १.२ लिटर एमटी सिग्मा प्रकाराची एक्स-शोरूम किंमत ७,४६,५०० रुपये आहे. कंपनीने फ्रॉन्क्स डेल्टा १.२ लीटर ५ एमटीची एक्स-शोरूम किंमत ८,३२,५०० निश्चित केली आहे. तर, डेल्टा प्लसची किंमत ८,७२,५०० रुपये निश्चित करण्यात आली आहे.

विभाग